हेरगिरीच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गोंधळ

By admin | Published: July 31, 2014 03:33 AM2014-07-31T03:33:55+5:302014-07-31T03:33:55+5:30

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात लावून धरला़

Massive confusion in the Parliament over the issue of espionage | हेरगिरीच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गोंधळ

हेरगिरीच्या मुद्यावरून संसदेत प्रचंड गोंधळ

Next

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचा मुद्दा अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात लावून धरला़ या मुद्यावरून काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ यामुळे लोकसभेचे कामकाज दोनदा तर राज्यसभेचे कामकाज चारदा स्थगित करण्यात आले़ दरम्यान; गडकरींच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त केंद्र सरकारने स्पष्टपणे फेटाळून लावले़
लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा लावून धरला़ गुजरातेत कथितरीत्या २९ हजार लोकांचे फोन टॅप केले गेलेत़ आता किती मंत्री, खासदार व नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे, हे सरकारने सांगावे, असे खरगे म्हणाले़ तिकडे राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला़ सरकारने मोठ्या प्रमाणात फोन टॅपिंगची परवानगी दिली आहे़ हा गंभीर मुद्दा आहे़ याहीपेक्षा एका केंद्रीय मंत्र्याच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळणे, गंभीर प्रकरण आहे़ याचसोबत काँग्रेस सदस्यांनी ‘मोदी मॉडेल नही चलेगा, आम्हाला जेपीसी (संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी) हवी’, अशी घोषणाबाजी सुरू केली़ या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज चारदा तहकूब करावे लागले़
गोंधळानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही सभागृहात स्पष्टीकरण देताना, टेहळणी उपकरणे सापडल्याचे वृत्त फेटाळून लावले़ मीडियातील संबंधित वृत्त पूर्णत: निराधार आहे़ खुद्द गडकरींनी याचा इन्कार केला आहे, असे ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Massive confusion in the Parliament over the issue of espionage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.