लालप्रसाद-मुलायम आता व्याही बनणार

By admin | Published: November 28, 2014 11:53 PM2014-11-28T23:53:09+5:302014-11-28T23:53:09+5:30

राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव लवकरच व्याही बनणार असून जनता दलाच्या एकत्रीकरणाची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे.

Lalprasad-Mulayam will now become Vahi | लालप्रसाद-मुलायम आता व्याही बनणार

लालप्रसाद-मुलायम आता व्याही बनणार

Next
नवी दिल्ली : राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव लवकरच व्याही बनणार असून जनता दलाच्या एकत्रीकरणाची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. अलीकडेच जनता दलाला नवसंजीवनी देण्यासाठी हे दोन नेते एकत्र येणार असल्याची घोषणा झाली होती. त्यापूर्वीच हे दोघे आप्तगणांच्या वैवाहिक बंधनातून नात्यांची वीण घट्ट करणार आहेत.
मुलायमसिंग यांचे नातू तेजप्रताप आणि लालूप्रसाद यादव यांची धाकटी कन्या राजलक्ष्मी हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. (वृत्तसंस्था)
 
 
जनता दलाच्या विलीनीकरणाची नांदी
नव्या नात्याची सुरुवात ही जनता दलाच्या फुटून निघालेल्या विविध गटांच्या विलीनीकरणाचे संकेत मानले जात आहेत. पहिल्यांदाच लालूप्रसाद आणि मुलायम हे मैत्रीचे रूपांतर नात्यात करीत असल्याने ही चांगली बातमी असल्याची प्रतिक्रिया समाजवाद्यांनी दिली आहे. यापूर्वी 199क् ते 2क्क्क् या काळात त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा झडत राहिली; मात्र त्यांची एकजूट प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. 
——————————-
दोन राज्यांचे सम्राट..
मंडलवादानंतर धर्मनिरपेक्ष राजकारणावर स्वार होत दोन्ही यादवांनी उत्तर प्रदेश आणि बिहारवर राज्य केले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा जास्त असल्याने केंद्रातही त्यांनी मानाचे स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मुलायमसिंग हे कायम दावेदार राहिले, तर लालूप्रसाद यांनी बिहारमध्ये तीन टर्म पूर्ण करीत इतिहास घडविला. समाजवादी पक्ष अजूनही उत्तर प्रदेशात सत्तेवर आहे, तर पशुखाद्य घोटाळ्यात अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर निवडणूक लढण्यास बंदीची नामुष्की आली; मात्र बिहारमधील बहुसंख्य घटकांवर त्यांचा अजूनही प्रभाव असल्यामुळे ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

 

Web Title: Lalprasad-Mulayam will now become Vahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.