माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:12 PM2024-05-06T18:12:51+5:302024-05-06T18:16:34+5:30

Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत.

lok sabha election 2024 Bhagirath Bhalke announced his support for the dhairyasheel mohite patil | माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?

माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?

Madha Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे.  या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आधी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता. पण त्यांनी दोन दिवसापूर्वी  भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता माढा लोकसभा मतदारसंघात आणखी ट्विस्ट आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी यांनी माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर भाजपातील मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. खासदार शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. 

काही दिवसापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली, यानंतर अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला पाठिंबा दिला. यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पंढरपूरमधील राजकारणातही मोठे बदल झाल्याचे दिसत आहे. आज पंढरपूरातील भालके गटाने बैठक घेत पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली आणि पाठिंबा जाहीर केला. 

Web Title: lok sabha election 2024 Bhagirath Bhalke announced his support for the dhairyasheel mohite patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.