पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:44 PM2018-12-27T22:44:22+5:302018-12-27T22:46:55+5:30

देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राचे हे पाऊल प्रशंसनीय असून त्यामुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.

Due to Prime minister's plans 'MSME' have to chance of expand:Dignitaries opinion | पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

Next
ठळक मुद्देउद्योजकांना एक कोटीपर्यंत कर्ज, नागपुरात १०० कोटींचे कर्जवाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राचे हे पाऊल प्रशंसनीय असून त्यामुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी १०० दिवसांचा सपोर्ट आणि आऊटरिच प्रोग्राम दाखल केला आहे. प्रोग्रामची उद्योजकांना माहिती देऊन तो अधिक सक्षम व्हावा, या उद्देशपूर्तीच्या शृंखलेंतर्गत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन (बीएमए) आणि डिक्की यांच्या संयुक्त समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात उद्योजकांची कार्यशाळा घेण्यात आली. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, व्हीआयएच्या फूड प्रोसेसिंग फोरमचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, डिक्कीच्या पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक, सीए समीर बाकरे उपस्थित होते.
उद्योगांना विस्तारासाठी नागपुरात १०० कोटींचे कर्ज वितरण
उद्घाटनप्रसंगी अतुल पांडे म्हणाले, योजनेंतर्गत पात्र उद्योजकांना उद्योगाच्या विस्तारासाठी इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) आणि पाच राष्ट्रीयकृत बँकांकडून एक कोटींपर्यंत कर्ज केवळ ५९ मिनिटात केवळ ९ टक्के व्याजदराने मिळणार आहे. याकरिता तारण ठेवावे लागणार नाही. कर्ज ऑनलाईन अर्ज करून मिळणार आहे. आतापर्यंत नागपुरात १०० कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. पंतप्रधानांचा ‘एमएसएमई’च्या विकासासाठी राबविण्यात येणारा कार्यक्रम प्रशंसनीय आहे. त्यामुळे उद्योजकांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.

Web Title: Due to Prime minister's plans 'MSME' have to chance of expand:Dignitaries opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.