144 जागांवर राष्ट्रवादीचा दावा

By admin | Published: July 24, 2014 02:52 AM2014-07-24T02:52:40+5:302014-07-24T02:52:40+5:30

किमान 144 जागा मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. काँग्रेसच्या नेत्यांनी, ही मागणी मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट केल्याचे सूत्रंनी सांगितले.

NCP claims for 144 seats | 144 जागांवर राष्ट्रवादीचा दावा

144 जागांवर राष्ट्रवादीचा दावा

Next
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत किमान 144 जागा मिळाव्यात, अशी ठाम भूमिका मांडली. काँग्रेसच्या नेत्यांनी, ही मागणी मान्य करता येणार नाही, असे स्पष्ट केल्याचे सूत्रंनी सांगितले.
या दाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  प्रफुल्ल पटेल यांनी दुजोरा दिला. राष्ट्रवादीची वाढलेली ताकद, लोकसभा निवडणुकीचे निकाल तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता राष्ट्रवादीचा दावा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रंनी सांगितले की, राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या भागात अधिक जागा वाढवून मागितल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जागांवरदेखील त्यांनी नव्याने दावा केला आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेतील, अशी शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: NCP claims for 144 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.