ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

By admin | Published: July 22, 2014 02:10 AM2014-07-22T02:10:32+5:302014-07-22T02:10:32+5:30

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत.

Let those people go freely! | ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

ज्यांना जायचे त्यांना खुशाल जाऊ द्या!

Next
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरीचे स्वर उमटू लागले आहेत. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी कडक भूमिका घेतली असून, पक्ष कोणत्याही दबावापुढे नमते घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे असले ते जाऊ शकतात, असे पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे. 
याशिवाय आसाम, हरियाणा आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला, असे उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले. यासंदर्भात पक्षाची भूमिका प्रवक्ते  अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. लोक असंतुष्ट आहेत, तर राहू देत. एकेक राज्यातून एकेक नेता जात आहे. त्या राज्यातील जनता सर्व बघत आहे, असे सिंघवी म्हणाले. नारायण राणो यांना मुख्यमंत्री बनायचे होते. अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद दिले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
ज्यांना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर आक्षेप आहे, त्यांनी पक्ष सोडावा, असेही ते म्हणाले. त्यांनी राणो यांचे नाव घेतले नाही परंतु त्यांचे संकेत राणो यांच्या दिशेने होते. केवळ महाराष्ट्रात नव्हेतर आसाम, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगालमध्ये देखील पक्षात बंडाचे वृत्त आहे. 
आसाममध्ये 32 आमदारांसह हिमांत बिस्वा सर्मा यांनी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडवले आहे. सर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सोबतच त्यांनी बंडात कोणत्याही थराला जाण्याची तयारी दर्शविली आहे. 
दुसरीकडे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील कडक भूमिका घेतली आहे. सर्मा यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनवण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आसामध्ये असंतुष्ट आणि पक्षश्रेष्ठींमध्ये आरपारची लढाई 
सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये माजी खासदार लालसिंग यांनी बंडखोरी केली. 
तर नॅशनल कॉन्फरन्सची काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी आली. हरियाणामध्ये खासदार चौधरी वीरेंद्रसिंग यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात बंड करून 
पक्ष सोडण्याची धमकी दिली आहे. 
पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे तीन 
आमदार फटून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तरीदेखील काँग्रेस पक्षश्रेष्ठी नमते घेण्यास तयार नाही. 
 
महाराष्ट्र, हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक जिंकणो कठीण आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लांब आहे. तर मग असंतुष्टांसमोर नमते काघ्यावे, काँग्रेस नेतृत्वाला वाटते आहे, असे सूत्रंनी सांगितले. महाराष्ट्राबाबत  रविवारी रात्री सोनिया गांधी यांनी राज्यातील मोठय़ा नेत्यांशी चर्चा केली होती आणि स्पष्ट केले की, पक्ष कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही. 

 

Web Title: Let those people go freely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.