न्यायाधीशच कायद्यात ढ !

By admin | Published: April 1, 2015 02:28 AM2015-04-01T02:28:04+5:302015-04-01T02:28:04+5:30

काळ्या रंगाचा ब्लॅकबेरी मोबाइल चोरल्याच्या खटल्यात ज्याच्याकडून पांढऱ्या रंगाचा मोबाइल हस्तगत झाला, अशा आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा

The judge is under the law! | न्यायाधीशच कायद्यात ढ !

न्यायाधीशच कायद्यात ढ !

Next

मुंबई : काळ्या रंगाचा ब्लॅकबेरी मोबाइल चोरल्याच्या खटल्यात ज्याच्याकडून पांढऱ्या रंगाचा मोबाइल हस्तगत झाला, अशा आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा अपिलात रद्द करून उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.
२१ मार्च २०१३ रोजी सायं़ ४.३० वाजताच्या सुमारास वडाळा रेल्वे स्टेशनजवळच्या रस्त्यावरून घरी जात असताना दोन जणांनी आपल्याला अडवून आपला काळ््या रंगाचा मोबाइल चोरून नेला. पाठलाग केला असता त्यांच्यापैकी एकाने पोटात चाकू खुपसून आपल्याला जखमी केले, अशी फिर्याद संगमनगर, एस.पी. रोड येथे राहणारे महेश मांडरे यांनी केली होती. लगेच दुसऱ्या दिवशी वडाळा पोलिसांनी या प्रकरणी राहुल गुरुप्रसाद मिश्रा या २० वर्षांच्या युवकाला व आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. अल्पवयीन आरोपीचे प्रकरण ज्युवेनाइल बोर्डाकडे गेले व राहुल मिश्राला सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.
उच्च न्यायालयात न्या. एम. एल. टहलियानी यांनी राहुलला मुख्यत: दोन मुद्द्यांवर निर्दोष मुक्त केले. एक आपला काळ््या रंगाचा मोबाइल आरोपीने चोरला असे मांडरे यांनी फिर्यादीत व साक्षीत म्हटले होते. आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केलेला मोबाइल पांढऱ्या रंगाचा होता व तरीही तोच आपला चोरीला गेलेला मोबाइल असल्याचे मांडरे यांनी सांगितले होते. ओळख परेडही दोन महिन्यांनंतर घेण्यात आली होती. घटनेच्या वेळी झटापटीत फिर्यादीने आरोपीचा चेहरा पाहून लक्षात ठेवणे असंभवनीय आहे. तरीही त्याने ओळख परेडमध्ये व न्यायालयातही आरोपीला ओळखले, हे विश्वासार्ह वाटत नाही.

Web Title: The judge is under the law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.