धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

By admin | Published: December 22, 2014 10:14 AM2014-12-22T10:14:25+5:302014-12-22T10:36:01+5:30

हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Doubt in the minds of the people on the role of the Center for conversion - Uddhav Thackeray | धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशभरातील हिंदूत्ववादी संघटनांना जोर चढला आहे. मोदींनी सर्वांना संयमाने वागा अशी तंबी दिली असली तरी हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

धर्मांतराच्या वादाविषयी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य केले आहे. देशात मोगल काळापासून धर्मांतर सुरु आहे. पोर्तुगिज, ब्रिटीश आणि मोगल या सर्वांनी हिंदूंचे धर्मांतर केले गेले होते. तर आत्ताच्या काळात आदिवासी व दलितांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतर केले जाते यावर धर्मनिरपेक्षवाद्यांचे काय म्हणणे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तलवार आणि पैशाचा वापर करुन जगभरात धर्मांतर होत आले आहे. आता फक्त गंगा उलटी वाहू लागल्यावर निधर्मीवाद्यांनी धर्मांतर योग्य नसल्याची आवई उठवली आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा या संघटना धर्मांतराचे स्वागत करत असून भाजपामधील मोठा वर्ग धर्मांतराच्या बाजूने आहे, पण सत्तेवर असल्याने त्यांची पंचाईत झाल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनांनी परभारे व परस्पर जे उपक्रम चालवले आहेत त्यामुळे मोदी सरकारला तोटा होईल का याचाही विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Doubt in the minds of the people on the role of the Center for conversion - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.