‘नाराजी’नामा!

By admin | Published: July 22, 2014 02:17 AM2014-07-22T02:17:38+5:302014-07-22T02:17:38+5:30

अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला

'Angry'! | ‘नाराजी’नामा!

‘नाराजी’नामा!

Next
नारायण राणो यांचा मुख्यमंत्र्यांवर ठपका : 
प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात
मुंबई : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेला शब्द पाळला नाही, मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे असले तरी जनहिताची कामे जलद गतीने होत नाहीत, अशा एक ना अनेक मुद्दय़ांवर आपली नाराजी व्यक्त करीत उद्योगमंत्री नारायण राणो यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहूनच आपण पुढील भूमिका जाहीर करू, असे सांगत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा संदिग्ध ठेवली. 
दरम्यान, राणोंचा राजीनामा स्वीकारला नसून ते पक्षातच राहतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टि¦टरवर  स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राणो यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. राणो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती मी त्यांना केली. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बसून चर्चा करू,  असे ठाकरे म्हणाले. राजीनामापत्रत राणो यांनी मुख्यमंत्र्यांची कार्यशैली आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर आक्षेप नोंदविले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढविली गेली,
तर पक्षाला विजय मिळणो कठीण 
आहे. भविष्यातील पक्षाच्या पराभवाचा वाटेकरी व्हायचे नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे राणो यांनी ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. (विशेष प्रतिनिधी)
 
शब्द पाळला नाही
नऊ वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलो तेव्हाच आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले होते. पण ते पाळले नाही. आपल्या समर्थकांना मंत्रिपद, विधान परिषद सदस्य वा महामंडळांवरही नियुक्त केले गेले नाही, असे आरोप राणो यांनी केले. 2क्क्9मध्ये माणिकराव ठाकरेंऐवजी देऊ केलेले प्रदेशाध्यक्षपद आणि त्याच वर्षी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद आपण नाकारले होते, असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांवर आक्षेप
च्लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठलेही प्रय} केलेले नाहीत.
च्जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.
च्भ्रष्टाचार रोखण्याचे उपाय होताना दिसत नाहीत.
च्प्रशासनाचा संथ कारभार, अधिकारी कामे टाळतात.
च्सरकार आणि सत्तारूढ पक्षात समन्वय नाही.
 
असा आहे ‘नाराजी’नामा 
च्बाराबलुतेदारांच्या संस्थांना कजर्माफीचा निर्णय 3 वर्षापूर्वी घेतला, पण अंमलबजावणी नाही.
च्बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना छोटी कामे देण्याचा निर्णय नाही.
च्एमआयडीसीच्या जागेवरील झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय दोन वर्षापासून प्रलंबित.
च्सागरी महामंडळाच्या प्रशासकीय इमारतीसाठी बीकेसीमध्ये अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याचा निर्णय होत नाही.
 
राणो काँग्रेसमध्येच राहतील
राणोंनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे आश्वासन आपल्याला आजच्या भेटीत दिल्याचे टि¦ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा बंगल्यावर राणोंशी झालेल्या भेटीनंतर केले. त्यांनी राजीनामा दिला तो आपण स्वीकारलेला नाही, असे ते म्हणाले. 

 

Web Title: 'Angry'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.