किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

By admin | Published: May 30, 2015 01:59 AM2015-05-30T01:59:31+5:302015-05-30T01:59:31+5:30

वर्षभरात रुग्णसंख्येत वाढ : दोन वर्षात १ लाख ९७ हजार बाधित.

381 victims in two years of pest-related illness | किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

किटकजन्य आजाराने घेतले दोन वर्षात ३८१ बळी

Next

बुलडाणा : गत दोन वर्षांमध्ये किटकजन्य आजाराने राज्यभरात ३८१ रूग्णांना जीव गमवावा लागला. गतवर्षी किटकजन्य आजाराचे ८८ हजार रुग्ण राज्यात होते. यावर्षी रुग्णांची संख्या वाढून एक लाखाच्यावर गेली आहे. हिवताप, हत्तीरोग, मेंदुज्वर, डेंग्यूताप, चिकुनगुनीया, चंडिपुरा आदी किटकजन्य आजारांमुळे राज्यभरात दोन वर्षात ३८१ लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे २0१४ आणि २0१५ या दोन वर्षात किटकजन्य आजाराची लागण झालेले १ लाख ९७ हजार रुग्ण राज्यात आढळून आले असल्याची माहिती राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अहवालातून पुढे आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने शहरी भागासह ग्रामीण जनता त्रस्त होते. किटकजन्य आजारांमुळे निर्माण होणार्‍या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचा समूळ नायनाट करण्यासाठी शासन, स्थानिक आरोग्य प्रशासन यांच्या समन्वयातून पावसाळ्यापूर्वी जून ते ऑगस्टदरम्यान विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम राज्यभरात राबविण्यात येतात; मात्र या योजना राबविणार्‍या स्थानिक आरोग्य यंत्रणेमध्ये अद्यापही बरीच पदे रिक्त आहे. याशिवाय आरोग्य योजनासाठी मिळणारा निधी अपुरा पडत असल्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेही किटकजन्य व विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे.

*डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक

         २0१४-१५ या वर्षात ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने राज्यभरात थैमान घातले होते. डेंग्यू पसरविणार्‍या एडिस एजिप्टाय डासाने संपूर्ण राज्याला डेंग्यूच्या विळख्यात ओढले आणि राज्यातील १२२ रुग्णाला मृत्यूच्या दारापयर्ंत नेऊन पोहोचवीले. ५८ हजार ५९४ नागरिक डेंग्यूने बाधीत झाले होते. तर २0१३-१४ या वर्षात डेंग्यूमुळे १२६ लोकांचा मृत्यू झाला,४१ हजार ६२२ लोक बाधीत झाले होते.

Web Title: 381 victims in two years of pest-related illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.