रक्त पिणारे वॅंम्पायर खरंच असतात का? वैज्ञानिकांचा दावा वाचून उडेल झोप...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 02:04 PM2024-03-27T14:04:14+5:302024-03-27T14:04:46+5:30

ती 40 वर्षांची आहे आणि एक टॅटू आर्टिस्ट आहे. तिचं नाव मिशेल आहे. तिने तिच्या अजब सवयींबाबत सांगितलं.

Woman drinks human blood says people call her vampire, is it real know truth | रक्त पिणारे वॅंम्पायर खरंच असतात का? वैज्ञानिकांचा दावा वाचून उडेल झोप...

रक्त पिणारे वॅंम्पायर खरंच असतात का? वैज्ञानिकांचा दावा वाचून उडेल झोप...

काही हॉलिवूड सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, काही लोक मनुष्यांचं रक्त पिऊन जिवंत राहतात. त्यांना वॅंम्पायर म्हटलं जातं. अशीच एक महिला आहे तिचं म्हणणं आहे की, ती कधी मनुष्यांचं रक्त पिणं बंद करणार नाही. ती 40 वर्षांची आहे आणि एक टॅटू आर्टिस्ट आहे. तिचं नाव मिशेल आहे. तिने तिच्या अजब सवयींबाबत सांगितलं.

मिशेलने 2013 साली 'माय स्ट्रेंज एडिक्शन' या शोमध्ये आपल्या अजब सवयींबाबत सांगितलं होतं. ती म्हणाली होती की, ती गायीपासून ते डुकरांचं रक्त पिते. अनेदका दिवसातून एक लीटर रक्त पिते. अनेकदा ती कॉफीमध्ये रक्त मिक्स करून पिते. 

द सनच्या रिपोर्टनुसार, मिशेल म्हणाली की, ती स्वत:ला वॅंम्पायर मानत नाही. ती टीनेजर असताना हे सगळं सुरू केलं होतं. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणारी मिशेल म्हणते की, 'मी रोज रक्त पिते. आजही मी मनुष्यांच्या रक्ताला प्राथमिकता देते. पण विश्वासाने ते मिळवणं फार अवघड आहे. मी एपिसोड केल्यापासून अमेरिकेत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ज्यामुळे मनुष्यांचं रक्त पिणं आणखी अवघड झालं आहे. मला नाही वाटत मी कधी थांबेन'. 

एका रिपोर्टनुसार, सायकॉलॉजिस्ट डॉक्टर ब्रायन शार्पलेस यांचा दावा आहे की, रक्त पिणारे वॅंम्पायरची कहाणी खोटी नाहीये. हे लोक असतात. आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला माहितही नसतात.

डॉक्टर ब्रायन शार्पलेस यांचं मत आहे की, वॅम्पायर, झोंबी ही नावं भलेही जरा अजब असतील. पण खरंच असतात. हे असे लोक आहेत ज्यांना रेनफील्ड सिंड्रोम म्हणजे रक्त पिण्याचा आजार असतो. या आजारात रूग्ण शारीरिक आणि मानसिक संतुष्टीसाठी रक्त पितो.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, दुर्मिळ मानसिक आजार लाइकेंथ्रोपीने पीडित लोकांना असं वाटू लागतं की, ते लांडगे झाले आहेत. तेच डॉक्टर ब्रायन यांचा दावा आहे की, ते अशा लोकांनाही भेटले आहेत जे स्वत:ला झोंबी समजतात आणि त्यांना सतत वाटत असतं की, त्यांचे अवयव आतून खराब होत आहेत.

Web Title: Woman drinks human blood says people call her vampire, is it real know truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.