इस्रायल-हमास युद्धातील अनोखी घटना; हल्ल्यात आईचा मृत्यू, पोटात चिमुकली जिवंत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:45 PM2024-04-23T17:45:49+5:302024-04-23T17:46:28+5:30

Gaza doctors save baby from womb: डॉक्टरांनी मृत आईच्या पोटातून बाळाला जिवंत बाहेर काढले.

Israel-Hamas-war-gaza-doctors-save-baby-from-womb-of-mother-killed-in-israeli-air-strikes | इस्रायल-हमास युद्धातील अनोखी घटना; हल्ल्यात आईचा मृत्यू, पोटात चिमुकली जिवंत...

इस्रायल-हमास युद्धातील अनोखी घटना; हल्ल्यात आईचा मृत्यू, पोटात चिमुकली जिवंत...

Israel-Hamas War: मागील अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुम्हीदेखील बॉम्ब हल्ल्यात शेकडो-हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण, रविवारी गाझामधील रफाह शहरात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात डोक्याला दुखापत झाल्याने एका 30 आठवड्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला. पण, गाझामधील डॉक्टरांनी मृत आईच्या पोट फाडून बाळाचे प्राण वाचवले. राफा येथील रुग्णालयात इमर्जन्सी सिझेरियनद्वारे बाळाची प्रसूती झाली. महिलेच्या पोटातून जिवंत बाहेर काढण्यात आलेले बाळ सुखरुप असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. 

हवाई हल्ल्यात आईचा मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, सबरीन अल सकानी नावाची महिलेच्या कुटुंबावर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात महिलेचा पती शोकरी आणि तीन वर्षांची मुलगी मलाकचा जागीच मृत्यू झाला. तर, सबरीनची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पोटातील बाळाला सिझेरियनद्वारे बाहेर काढून काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Israel-Hamas-war-gaza-doctors-save-baby-from-womb-of-mother-killed-in-israeli-air-strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.