बफर क्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:14 PM2017-08-21T23:14:56+5:302017-08-21T23:15:21+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाºया गावांच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे.

To give gas connection to families in buffer area | बफर क्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देणार

बफर क्षेत्रातील कुटुंबांना गॅस कनेक्शन देणार

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : चिखली येथे गॅस कनेक्शनचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाºया गावांच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना देण्यात येईल. बफर क्षेत्रातील गावांचे इंधनासाठी वनावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्वच कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत येथे वन्यजीव विभागाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गावातील कुटुंबांना गॅस कनेक्शनचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य माधुरी पातोडे, पं.स. सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, वन्यजीव विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी गीता पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, सरपंच सुधाकर कुर्वे, नायब तहसीलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये काही गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्या गावांच्या अडचणी वाढल्या आहेत. बफर क्षेत्रात गुरे चराई करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुरणांचा विकास करणे गरजेचे आहे. जंगलाच्या परिसरात असलेल्या शेतीला सौर कुंपण दिल्यास वन्य प्राण्यांकडून शेतपिकाची नासाडी होणार नाही. कोहमारा येथे घरगुती इंधनासाठी जळावू लाकडाचा डेपो सुरू करण्यात यावा. बांबू आधारित व्यवसाय करणाºयांना बांबू उपलब्ध करून द्यावेत, असेही ते म्हणाले.
पातोडे म्हणाल्या, या भागातील काही गावांचा समावेश बफर क्षेत्रामध्ये झाला आहे. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांची वन व्यवस्थापनबाबतची जबाबदारी आता वाढली आहे. इंधनासाठी वनावर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हत्तीमारे म्हणाले, गावातील सर्वच कुटुंबांकडे गॅस कनेक्शन नसल्यामुळे वन विभागाने जलावू लाकडांची व्यवस्था करु न द्यावी. जनवन योजनेच्या माध्यमातून गावातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करावे व आवश्यक असलेले पुस्तके उपलब्ध करून द्यावे. वन्यजीव विभागाने गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
पवार म्हणाल्या, जनवन योजनेच्या माध्यमातून बफर क्षेत्रातील गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. जंगलाचे व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी बफर क्षेत्रातील ग्रामस्थांची वाढली आहे. विविध घटकातील कुटुंबांना गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात येईल. या वेळी या योजनेबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते यादवराव मुनेश्वर या लाभार्थ्याला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. या वेळी चिखली ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आभार गिरीधारी हत्तीमारे यांनी मानले.

Web Title: To give gas connection to families in buffer area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.