Fact Check : प्रचारादरम्यान जनता भडकली; मात्र 'तो' उमेदवार भाजपाचा असल्याचा दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:07 PM2024-04-18T15:07:08+5:302024-04-18T15:21:02+5:30

लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत भाजपा उमेदवाराला विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला आहे.

fact check person facing public anger during election campaign is not a bjp candidate | Fact Check : प्रचारादरम्यान जनता भडकली; मात्र 'तो' उमेदवार भाजपाचा असल्याचा दावा खोटा

Fact Check : प्रचारादरम्यान जनता भडकली; मात्र 'तो' उमेदवार भाजपाचा असल्याचा दावा खोटा

Created By: आज तक 
Translated By: ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका भाजपा उमेदवाराला विकासाच्या मुद्द्यावरुन विरोध सुरू असल्याचा दावा केला आहे. तसेच त्या भाजपा उमेदवाराला  एका व्यक्तीने शिवीगाळ केल्याचाही दावा केला आहे.

व्हिडीओमध्ये काही लोक घराबाहेर जमलेले दिसत आहेत. यातील एक व्यक्ती गावातील दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत माईकवर सांगत आहे की, हा खासदार गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच इथे आला आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांना २७.५ हजार रुपये दिले होते. मात्र आमच्या माता भगिनींना आजही पाण्यासाठी दोन किलोमीटर दूर जावे लागते.

यानंतर तेथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला शांत केले. नेटकरी व्हिडीओ शेअर करत या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. कोणी मंत्री किंवा आमदार नुसती मते मागायला आले तर त्याच पद्धतीने स्वागत केले पाहिजे अशा प्रतिक्रिया येत आहेत. सोबत ‘भाजपा हटाव, देश वाचवा’ असं लिहिले आहेत.

आज तकच्या फॅक्ट चेक तपासणीत असे आढळून आले आहे की, या व्यक्तीने २०२३ च्या राजस्थान निवडणुकीत भाजपच्या नेत्यासोबत नव्हे तर काँग्रेसच्या उमेदवारावर नाराजी व्यक्त केली होती. दीपचंद खेरिया नावाच्या या उमेदवाराने २०१८ मध्ये बसपाच्या तिकिटावर या भागातून निवडणूक जिंकली होती. २०२३ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते.

सत्य कसे जाणून घेतले?

व्हायरल व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका व्यक्तीने लिहिले आहे की, हा व्हिडीओ राजस्थानच्या किशनगढबास येथील देवता गावातील आहे. आणि येथील आमदाराचे नाव आहे दीपचंद खेरिया. 

या आधारावर, काही कीवर्ड शोधल्यानंतर, आम्हाला "द अलवर न्यूज" नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ सापडला. येथील व्हिडीओ १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर करण्यात आला होता. किशनगढबास विधानसभा जागा अलवर जिल्ह्यात येते.

या पेजवरील व्हिडीओसोबत सांगण्यात आले आहे की, किशनगढबसचे आमदार दीपचंद खेरिया जेव्हा या गावात गेले तेव्हा त्यांचे अशा प्रकारे स्वागत करण्यात आले. हा व्हिडीओ नोव्हेंबर २०२३ मध्ये इतर Facebook खात्यांवर याच माहितीसह शेअर करण्यात आला होता. दीपचंद खेरिया हे किशनगढबास विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असल्याचेही सांगण्यात आले. त्या वेळी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका सुरू होत्या. 

शोध घेतल्यावर, आम्हाला या प्रकरणाशी संबंधित झी न्यूजचा १६ नोव्हेंबर २०२३ चा अहवाल देखील सापडला. या बातमीत असेही म्हटले आहे की, काँग्रेसचे उमेदवार दीपचंद खेरिया जेव्हा 'देवता' गावात गेले तेव्हा त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. इतर काही माध्यम संस्थांनीही त्यावेळी या प्रकरणाला कव्हर केले होते. 

त्यावेळी खेरिया यांनी निवडणूक जिंकली होती. दीपचंद खेरिया २०१८ पासून किशनगढबास मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१८ मध्ये ते बहुजन समाज पक्षाकडून विजयी झाले पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्हायरल व्हिडीओमध्ये, पिवळा फेटा परिधान केलेल्या आणि कुर्ता-पायजमा आणि हाफ जॅकेट घातलेल्या व्यक्तीच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती दीपचंद खेरिया आहेत.

(सदर फॅक्ट चेक 'आज तक' या वेबसाइटने प्रसिद्ध केले आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check person facing public anger during election campaign is not a bjp candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.