IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

By दयानंद पाईकराव | Published: May 5, 2024 11:15 PM2024-05-05T23:15:57+5:302024-05-05T23:17:35+5:30

पवन पांडुरंग मंगर असे ३२ वर्षीय अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

One Arrested for Gambling on IPL 2024 cricket match by police and 59 thousand 200 rupees seized | IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

IPL क्रिकेट मॅचवर खयवाडी करणारा गजाआड; ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

दयानंद पाईकराव/नागपूर: रॉयल चॅलेंज बंगळुर विरुद्ध गुजरात टायटन्स या आयपीएल मॅचवर खयवाडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने गजाआड करून ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवन पांडुरंग मंगर (३२, रा. द्वारकानगरी, चकोलेवाडी खरबी वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शनिवारी ४ मे रोजी रात्री ९.३० वाजता गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी द्वारकानगरी चकोलेवाडी येथे धाड टाकली असता आरोपी पवन हा त्याचा पाहिजे असलेला साथीदार राकेश नरुले याच्या मदतीने आयपीएल क्रिकेट लाईव्ह मॅचवर मोबाईलवरून खयवाडी करताना आढळला. त्याच्या ताब्यातून एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, रिमोट, ३ मोबाईल, मॅचचे सौदे लिहिलेली पाने असा एकुण ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: One Arrested for Gambling on IPL 2024 cricket match by police and 59 thousand 200 rupees seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.