चंपावती शाळेला नोटीस

By Admin | Published: September 25, 2014 12:18 AM2014-09-25T00:18:55+5:302014-09-25T00:55:06+5:30

बीड : येथील चंपावती शिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी शिक्षण विभागातील पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ या प्रकरणी बुधवारी शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी

Notice to Champawati School | चंपावती शाळेला नोटीस

चंपावती शाळेला नोटीस

googlenewsNext


बीड : येथील चंपावती शिक्षण संस्थेमध्ये मंगळवारी शिक्षण विभागातील पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता़ या प्रकरणी बुधवारी शिक्षणाधिकारी (मा़) लता सानप यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
शहीद भगतसिंग विद्यालयामध्ये सचिन दामोदर खाडे हे शिक्षक अतिरिक्त ठरले होते़ त्यांना माध्यमिक शिक्षण विभागाने चंपावती विद्यालयात सामावून घेण्याचे आदेश दिले होते़ मात्र चंपावती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव पवार हे त्यांना रुजू करून घेत नव्हते़ त्यामुळे बुधवारी दुपारी शिक्षणाधिकारी लता सानप, उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचे पथक चंपावती विद्यालयात गेले होते़
पथकाने शिक्षक खाडे यांना रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली़ तेव्हा तेथे साहेबराव भोपळे हे आले़ त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती़
शिक्षणाधिकारी सानप यांनी मुख्याध्यापक हौसराव पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ शिक्षण विभागातील पथकाशी गैरवर्तन, आदेशाची अंमलबजावणी न करणे याचा खुलासा करावा, असेही आदेशात म्हटले आहे़ भोपळे यांनी केलेल्या धक्काबुक्कीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, असेही नोटिशीत म्हटले आहे़ दरम्यान, अतिरिक्त शिक्षक मोठ्या प्रमाणावर असताना सचिन खाडेंसाठीच अट्टाहास का ? असा सवाल उपस्थित झाला आहे़
वेतनश्रेणीची भरपाई द्यावी
चंपावती विद्यालयातील लिपिक संजय कुलकर्णी यांना नियम डावलून संस्थेने वेतनश्रेणी बहाल केली होती़ त्यामुळे शासनाचे नुकसान झाले आहे़ भरपाई द्यावी, असे फर्मान नोटिशीद्वारे सोडण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Notice to Champawati School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.