lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विधीमंडळ-अन्याय खान्देशावर-

विधीमंडळ-अन्याय खान्देशावर-

सर्वात जास्त अन्याय खान्देशावर !

By admin | Published: December 23, 2014 12:04 AM2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30

सर्वात जास्त अन्याय खान्देशावर !

Legislature-injustice on Khandesh- | विधीमंडळ-अन्याय खान्देशावर-

विधीमंडळ-अन्याय खान्देशावर-

्वात जास्त अन्याय खान्देशावर !

एकनाथ खडसे : केळकर समितीचा निष्कर्ष

नागपूर- महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अन्याय विदर्भ, मराठवाड्यावर नव्हे तर खान्देशावर झाल्याचा निष्कर्ष डॉ. विजय केळकर यांच्या समितीने काढला असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधान परिषदेत जाहीर केले.
केळकर समितीचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीवरून काही काळ सभागृहातील वातावरण तापले होते. माणिकराव ठाकरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय उपस्थित केला. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बाकी आहे. केळकर समितीचा अहवाल सोमवारीच जाहीर करून चर्चेला वेळ देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर केळकर समितीची चर्चा करायची असेल तर अधिवेशनाचा कालावधी आठ-दहा दिवस वाढवण्याची सूचना खडसे यांनी केली. सभागृहात अहवाल मांडला जाण्यापूर्वी वृत्तपत्रात त्यावर आधारित वृत्ते कशी आली, असा सवाल अमरसिंह पंडित यांनी केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर केला जाईल. मात्र अहवाल फुटला हे म्हणणे योग्य नाही. ७५० पानांचा अहवाल कुणालाही उपलब्ध झालेला नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Legislature-injustice on Khandesh-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.