lokmat Supervote 2024
Lokmat Money > National Saving Certificate Scheme

देशात अशा अनेक सरकारी बचत योजना आहेत ज्या तुम्हाला बचतीसोबत पैसे कमवण्याची संधी देतात. पोस्ट ऑफिसगुंतवणूकदारांना डिपॉझिटचे अनेक पर्याय ग्राहकांना देते. पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या अंतर्गत, पोस्ट ऑफिस अनेक योजना चालवते. यामध्ये उत्तम परतावा, कर सूट इत्यादी आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.  यात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश आहे. या योजनांवरील व्याजदर दर तिमाहीत सुधारित केले जातात. पाहूया कोणत्या आहेत या स्कीम्स.

फक्त १०० रुपयांत उघडा खातं
पोस्ट ऑफिसच्या एनएससी योजनेतील गुंतवणूक ५ वर्षांसाठी मर्यादित असते. पोस्ट ऑफिस, बँकेमध्ये जाऊन कमीत कमी १०० रुपयांमध्ये खातं उघडता येते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच कालमर्यादा तुम्हाला वाढवताही येऊ शकते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सध्या ७.७ टक्के व्याज दिलं जात आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला सूट देण्यात आली आहे.

कुठे उघडलं जातं खातं
एनएससीअंतर्गत देशभरातील पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये खातं उघडलं जाऊ शकते. कोण करू शकतं गुंतवणूक- कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावेसुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेतील मर्यादा ५ वर्षांसाठी आहे. व्याजाच्या दरात दरवर्षी बदल होत असतो. त्यात कंपाऊंड इंटरेस्टमुळे पैसे वाढत जातात. तसेच १.५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीपर्यंतच फक्त करात सवलत दिली जाते. विशेष म्हणजे ही योजना सरकारी असल्यानं या योजनेत तुमचे पैसे पूर्णतः सुरक्षित राहतात. सरकारनं ठरवल्यास तुम्हाला या योजनेतून जास्त परतावा मिळू शकतो. तसेच तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही. 

कुठे खरेदी करू शकता सर्टिफिकेट
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचं एक माध्यम आहे. यात निश्चित व्याजदरावर गुंतवणूकदाराला फायदा मिळतो. भारतातील पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेंतर्गत खातं उघडता येऊ शकतं. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट खरेदी करण्याची प्रक्रिया साधी-सोपी आहे. तुम्ही पोस्टाच्या कोणत्याही ऑफिसमधून हे सर्टिफिकेट खरेदी करू शकता. परंतु नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काही आवश्यक दस्तावेजांची पूर्तता करावी लागते. तसेच फॉर्ममधून तुम्हाला त्याची माहिती द्यावी लागते, ज्यात तुम्हाला नाव आणि गुंतवणुकीच्या रकमेचा उल्लेख करावा लागेल. तसेच यासाठी तुम्ही धनादेश किंवा रोख रक्कमही देऊ शकता. 

कधी काढू शकता पैसे 
या योजनेची कालमर्यादा ५ वर्षांची असते. विशेष म्हणजे तुम्ही दिलेल्या अटीचं व्यवस्थित पालन केल्यास १ वर्षांनंतरही तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमधील व्याजदर दर ३ महिन्यांनी बदलण्यात येते. त्यामुळेच गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतील व्याजदरात चढ-उतार होत राहतात. या योजनेचा लाभ १८ वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तीला मिळू शकतो. या योजनेत अल्पवयीनांना गुंतवणूक करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे या योजनेंतर्गत संयुक्तरीत्याही गुंतवणूक करता येते. परंतु परदेशी नागरिक आणि हिंदू संयुक्त कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही.