एसीपी बचाटे, एलसीबी प्रमुखांना ‘डीजी इन सिग्निया’

By प्रदीप भाकरे | Published: April 26, 2024 04:34 PM2024-04-26T16:34:32+5:302024-04-26T16:36:04+5:30

१८ अधिकारी अंमलदारांना सन्मानचिन्ह : पोलीस महासंचालकांकडून शिक्कामोर्तब

ACP Bachate, LCB Chief 'DG In Signia' | एसीपी बचाटे, एलसीबी प्रमुखांना ‘डीजी इन सिग्निया’

ACP Bachate, LCB Chief 'DG In Signia'

अमरावती: राज्यभरातील खाकीतील ८०० अधिकारी तथा अंमलदारांना पोलिस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल 'डीजी इनसिग्निया' अर्थात पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २५ एप्रिल रोजी त्याबाबतचे आदेश पारित केलेत. त्यात अमरावती शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे एसीपी शिवाजीराव बचाटे, एलसीबीचे पीआय किरण वानखडे, अमरावती ग्रामीणमधून नुकतेच बदलीवर गेलेले पीआय हेमंत ठाकरे यांच्यासह अमरावती शहर, ग्रामीण व एसआरपीएफ दलातील एकूण १८ अधिकारी, अंमलदारांना मानाचे 'डीजी इनसिग्निया' पदक जाहीर झाले आहे.

             अमरावती एसआरपीएफमधील पोलीस उपनिरिक्षक आर. एस. हेगाडे व के. एच. नागपुरे, अमरावती शहरमधील सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय गुरमाळे व अशोक पिंपळकर, ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद किटे आणि राजेश काळकर यांना पदक जाहीर झाले आहे. शहर आयुक्तालयातील हेड कॉन्स्टेबल नरेंद्र भुरंगे, अयुब खान सैदूर रहमान खान, चंद्रकांत जनबंधू, प्रवीण बुंदेले, नितीन आखरे, नंदकिशोर अंबुलकर, अशोक वाटाणे, मनीष गहाणकर आणि पोलिस शिपाई अभय वाघ यांचा समावेश आहे. डीजी इनसिग्निया पदक प्राप्त पोलिस अधिकारी, अंमलदार यांना या पदकाचे वितरण १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा स्टेडियमवर होणाऱ्या मुख्य शासकीय सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाते.

बचाटे कर्तव्यनिष्ट अधिकारी
पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झालेले शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांनी अमरावती शहरात कोतवाली, बडनेरा येथे ठाणेदार म्हणून उत्तम काम केले आहे. येथे कार्यरत असतानाच त्यांना एसीपी म्हणून पदोन्नती मिळाली. क्राईम एसीपी म्हणून देखील त्यांनी अमिट छाप सोडली आहे. तर दुसरीकडे, अमरावती ग्रामीणचा पंचप्राण असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे पोलीस निरिक्षक किरण वानखडे हे देखील कर्तव्यनिष्ट अधिकारी म्हणून ओळखले जातात.

 

Web Title: ACP Bachate, LCB Chief 'DG In Signia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.