Nitin Gadkari in Yavatmal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:39 PM2024-04-24T16:39:08+5:302024-04-24T16:39:27+5:30

Nitin Gadkari Fainted: नितीन गडकरींची शुगर कमी झाल्याने त्रास झाला, डॉक्टरांनी तपासल्यानंतर लगेच पुन्हा स्टेजवर गेले.

Nitin Gadkari fainted during speech felt dizzy in Yavatmal Pusad Rally Lok sabha election 2024 | Nitin Gadkari in Yavatmal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले!

Nitin Gadkari in Yavatmal: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्टेजवर भाषण करतानाच आली भोवळ, अंगरक्षकाने सावरले!

Nitin Gadkari Fainted in Yavatmal : यवतमाळ: सध्या राज्यात आणि देशात लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक २०२४ ची धामधूम सुरू आहे. एकूण सात टप्प्यात होणार असलेल्या मतदान प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला पार पडले. पहिल्या टप्प्यात सुमारे ६४ टक्के मतदान झाले. या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारसभा संपल्यानंतर आता ते उर्वरित टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. याचदरम्यान, नितीन गडकरी यांनी स्टेजवर भाषण करतानाच भोवळ आल्याची घटना घडली. भरसभेत भाषणादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे. नितीन गडकरी भाषण होते, त्याच वेळी अचानक त्यांना भोवळ आली. भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते पडले असते, पण तितक्यात स्टेजवरील लोकांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. यवतमाळच्या पुसद येथे ही सभा सुरु होती. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत हा प्रकार घडला.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसद येथे गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांना त्यांनी जवळपास १५ मिनिटे संबोधित केले. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देत असतानाच त्यांना अचानक भोवळ आली. ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच अंगरक्षकांनी पकडले. स्टेजखाली उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी गडकरी यांच्यावर उपचार केले. त्यांची शुगर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १५ मिनिटे आराम केल्यानंतर गडकरी पुन्हा स्टेजवर आले. आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सभा व रॅलीच्या माध्यमातून राजकीय पक्षांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करून आपण तंदुरूस्त असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील पुसद येथील रॅली दरम्यान उष्णतेच्या कारणास्तव थोडंसं अस्वस्थ वाटले. पण आता मी पूर्णपणे तंदुरूस्त आहे आणि पुढील सभेत सहभागी होण्यासाठी वरूडला निघालो आहे. माझ्यावर तुम्ही दाखवलेले प्रेम आणि सदिच्छांसाठी सर्वांचे आभार, असे ट्विट गडकरींनी केले आहे.

याआधीही सार्वजनिक कार्यक्रमात आली होती भोवळ

याआधीही २०१९ साली १ ऑगस्टला गडकरी यांना सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ आली होती. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी अचानक खाली बसले आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. यावेळी मंचावर तत्कालीन मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

Web Title: Nitin Gadkari fainted during speech felt dizzy in Yavatmal Pusad Rally Lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.