भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार 

By धीरज परब | Published: May 3, 2024 01:50 PM2024-05-03T13:50:17+5:302024-05-03T13:50:47+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा  गड हा स्वतःकडे राखत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.

BJP leaders in Thane Lok Sabha Constituency-Mira Bhayander will campaign for the Mahayuti, will bring out the disgruntled | भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार 

भाजपातील तिघांचाच राजीनामा, शिवसेनेला ठाणे सुटल्यानं होते नाराज; पदाधिकारी करणार महायुतीचा प्रचार 

 

मीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघ शिंदेसने कडे जाऊन नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर मीरा भाईंदर मधून गुरुवारी भाजपाच्या केवळ तिघा जणांनी भाजपातील पदाचा राजीनामा दिला .  त्यातच गुरुवारी राजीनामा दिलेल्या ध्रुवकिशोर पाटील यांनी शुक्रवारी मात्र आपण महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितल्याने एकूणच शिंदे सेनेला जागा गेल्याने भाजपा कार्यकर्ता खूपच आक्रोशीत आहेत व काम करणार नाही असे सांगणाऱ्या स्थानिक भाजपा नेत्याचा विरोधाचा बार फुसका ठरला आहे. 

ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे . आनंद दीघे यांनी खेचून घेतलेल्या ह्या लोकसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षां पासून अपवाद वगळता शिवसेनेचा खासदार राहिला आहे . शिंदेसेना , भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुती मध्ये ठाण्यावर भाजपाने लक्ष केंद्रित केले होते .  भाजपाचे संजीव नाईक यांनी ७ एप्रिल रोजीच्या भाईंदरच्या बालाजी नगर मधील बैठकीत बोलताना पक्षाने आपल्याला उमेदवारीच्या अनुषंगाने हिरवा कंदील दिला असून प्रचाराची सुरवात आपण करत असल्याचे म्हटले होते .  त्या नंतर शहरात भेटीगाठी करत प्रचार चालूच ठेवला होता .  नाईक यांच्या प्रचार व वक्तव्या मुळे शिंदे सेनेत चलबिचल होती .  माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी देखील शिंदेसेनेचा प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडत सेनेवर आरोप केले होते . 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा  गड हा स्वतःकडे राखत ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ठाण्याची उमेदवारी मिळाल्याने शिंदेसेनेचे शिवसैनिक यांच्यातील अस्वस्थता व शंकाकुशंकांना विराम मिळाला आहे . परंतु मीरा भाईंदर भाजपात विशेषतः  मेहता व  समर्थक यांच्यात नाराजी दिसून आली आहे . गुरुवारी नवी मुंबईत अनेक नाईक समर्थकांनी राजीनामे दिल्या नंतर मीरा भाईंदर मधून सुद्धा मेहता  यांची शिंदेसेना विरोधी भूमिका पाहता भाजपाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी राजीनामा देतील असा दावा केला जात होता . परंतु जिल्हा सचिव ध्रुवकिशोर पाटील , अल्पसंख्यांक सेल चे उपाध्यक्ष एजाज खतिब व युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल पाटील ह्या तिघांनी राजीनामा दिला . ध्रुवकिशोर हे पूर्वी पासून नाईक समर्थक व भाजपात गेल्या नंतर मेहता समर्थक म्हणून ओळखले जातात . तर विशाल  , खतिब हे भाजपातील मेहता समर्थक म्हणून ओळखले जातात . 

शिवसेनेला जागा गेल्याने कार्यकर्ते खूपच नाराज व आक्रोशित आहेत. काम करणार नाही अशी मानसिकता बनवली आहे.  शिवसेना लढणार म्हणून कर्यकर्ते उदास व अपसेट आहेत . आमचे वर्चस्व दाबण्याचे , वारंवार व व्यावसायिक त्रास देण्याचे आणि तोडफोडीचे राजकारण केल्याने सर्व दुखी आहेत असे नरेंद्र मेहतांनी म्हटले होते . भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मात्र तिघांनी राजीनामा दिला होता पण त्यांची समजूत काढली असून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना शहरातील भाजपा कार्यकर्ते निवडून देऊन युती धर्म पाळतील असे म्हटले आहे . आम्हा सर्वांचे एकच लक्ष्य आहे कि , ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देऊन मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे . त्यामुळे म्हस्के हे उमेदवार असणार व या बद्दल नाराजी नाही .  

संजीव नाईक यांना उमेदवारी दिली नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे ध्रुवकिशोर यांनी म्हटले  . महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार करणार कि नाही ? ह्यावर बोलणे टाळत एकरात्रीत चमत्कार होऊ शकतो असे वक्तव्य पाटील यांनी गुरुवारी केले होते . परंतु शुक्रवारी मात्र ध्रुवकिशोर यांनी महायुतीचे उमेदवार म्हस्के यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले . भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल भोसले यांनी सांगितले कि , महायुतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजे पंतप्रधान मोदींचा विरोध असे आम्ही मानतो . देशाच्या व राज्याच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णय विरुद्ध कट्टर भाजपाचे कार्यकर्ते जाणार नाहीत . वाहत्या गंगेत काही जण भाजपात पोट भरण्यासाठी आले असतील तर ते भाजपाचे कट्टर कार्यकर्ते नाहीत तर कटोरा घेऊन आलेले कार्यकर्ते आहेत अशी टीका शहरातील राजीनामा नाट्यावर भोसले यांनी केली .  भाजपा कार्यकर्ता नाराज असल्याचे खोटे सांगून स्वतःच्या पोळ्या भाजायचा खटाटोप  ज्यांनी चालवला होता ते देखील केवळ तिघानीच राजीनामा दिल्याने तोंडघशी पडल्याचा टोला भोसले यांनी लगावला . 

Web Title: BJP leaders in Thane Lok Sabha Constituency-Mira Bhayander will campaign for the Mahayuti, will bring out the disgruntled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.