Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:48 PM2024-04-28T12:48:23+5:302024-04-28T12:49:10+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. तसेच ‘निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा धमकीचा मजकूर असलेले पत्र चिटकवण्यात आले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Prakash Shendge's car was laced with shoes, black strips and a threatening letter | Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले

Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले

सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. तसेच ‘निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा धमकीचा मजकूर असलेले पत्र चिटकवण्यात आले आहे. सांगलीतील सर्व्हीस रस्त्यावरील ग्रेट मराठा समोर हा प्रकार घडला आहे.

माजी आमदार शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा मतदारसंघात प्रचारही सुरू आहे. सांगलीत मुक्कामास असताना ते ग्रेट मराठा हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांची मोटार हॉटेलसमोर पार्किंगमध्ये लावली होती. पहाटेच्या सुमारास कोणीतरी त्यांच्या मोटारीला चपलांचा हार घातला. तसेच मोटारीवर काळा रंग फासला. तसेच धमकीचा मजकूर असलेले पत्र चिटकवण्यात आले आहे. या पत्रात ‘निवडणुकीतून माघार घ्यावी, नाशिकमध्ये जशी माघार घेतली तशी सांगलीतून माघार घ्यावी. मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा मजकूर लिहिलेला आहे.रविवारी सकाळी शेंडगे यांचा चालक मोटारीजवळ आल्यानंतर त्याला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्याने शेंडगे यांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्तेही मोटारीजवळ जमले. त्यांनी ‘यळकोट..यळकोट जय मल्हार’ अशी घोषणाबाजी केली.

याबाबत बोलताना शेंडगे म्हणाले, ‘मी मराठा आरक्षणाला विरोध नाही. मनोज जरांगेची मागणी संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवण्याची आहे. त्याला आमचा विरोध आहे. ओबीसी विरूद्ध मराठा हा संघर्ष सांगली जिल्ह्यात नव्हता. परंतू आता उघडपणे मला धमकी दिली आहे. भुजबळांनी माघार घेतली आहे. तुम्ही माघार का घेत नाही. माघार नाही घेतली तर चपलेला हार घालून काळे फासले जाईल असा इशारा दिला आहे. निवडणूक मुक्त वातावरणात झाली पाहिजे. लोकशाहीत कोणालाही मते मागण्याचा अधिकार आहे. माझी कार्यकर्त्यांना तसेच मराठा समाजाला विनंती आहे, ही निवडणूक शांततेत पार पाडूया. वाद घालण्याची आमची इच्छा नाही. यापूर्वी कधी येथे असा प्रकार घडला नाही. या घटनेचा निषेध करतो. निवडणूक आयोगाकडे तसेच पोलिसांकडे तक्रार करणार आहे. ओबीसी व धनगर समाज हा प्रकार सहन करणार नाही. या इशाऱ्यांना मी घाबरणार नाही. मुळीच पळून जाणार नाही. निवडणूक लढणारच आहे.’

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Prakash Shendge's car was laced with shoes, black strips and a threatening letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.