अलिबाग : ९३ व्या वर्षी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड गोपाळ लिमये यांनी बजावला मतदानाचा हक्क

By निखिल म्हात्रे | Published: May 7, 2024 12:14 PM2024-05-07T12:14:49+5:302024-05-07T12:15:22+5:30

प्रतिक्रिया देताना लिमये यांनी आपण 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे सांगितले. 

Alibaug At the age of 93 senior lawyer Adv Gopal Limaye exercised his right to vote | अलिबाग : ९३ व्या वर्षी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड गोपाळ लिमये यांनी बजावला मतदानाचा हक्क

अलिबाग : ९३ व्या वर्षी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड गोपाळ लिमये यांनी बजावला मतदानाचा हक्क

अलिबाग - लोकसभा मतदार संघाच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. अलिबाग ब्राह्मणआळी येथील कन्याशाळेतील मतदान केंद्रावर 93 वर्षीय ज्येष्ठ विधीज्ञ ॲड गोपाळ वामन लिमये यांनी सर्वप्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रतिक्रिया देताना लिमये यांनी आपण 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे सांगितले. 

यावेळी त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांनी तसेच युवा मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या परदेशी पथकातील श्रीलंका येथील सिलया हिलक्का पासिलीना यांनी गोपाळ लिमये यांनी आवर्जून भेट घेत विचारपूस केली.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ ज्योस्ना पडियार, सहाय्यक निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे उपस्थित होत्या.

Web Title: Alibaug At the age of 93 senior lawyer Adv Gopal Limaye exercised his right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.