मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 06:02 PM2024-05-04T18:02:28+5:302024-05-04T18:04:32+5:30

बारामती लोकसभा मतदार संघात दोन दिवसांवर मतदान आले आहे...

Otherwise the Maratha society will take a decision as per the instructions of Jarange Patil, Maratha Kranti Morcha warned | मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मराठा समाज जरांगे पाटलांच्या सूचनेनुसार बारामतीत निर्णय घेणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

बारामती (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाचाबारामतीच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दोन दिवसांवर मतदान आले आहे. मात्र, अजूनपर्यंत एकाही उमेदवाराने व त्यांच्या पक्ष प्रमुखाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत कोणतीही व कसलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याबाबत मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.

प्रचाराचे अजून दोनच दिवस बाकी असताना बारामती लोकसभेच्या उमेदवारांनी त्यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेईल,असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Otherwise the Maratha society will take a decision as per the instructions of Jarange Patil, Maratha Kranti Morcha warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.