लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निगडीत २९ लाखांची रोकड जप्त, सर्वेक्षण पथकाची कारवाई

By विश्वास मोरे | Published: May 2, 2024 04:55 PM2024-05-02T16:55:52+5:302024-05-02T16:57:13+5:30

निगडी येथे सर्वेक्षण पथकाने २९ लाखांची रोकड जप्त केली....

In the wake of the Lok Sabha elections, cash of 29 lakhs was seized, the action of the survey team | लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निगडीत २९ लाखांची रोकड जप्त, सर्वेक्षण पथकाची कारवाई

लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर निगडीत २९ लाखांची रोकड जप्त, सर्वेक्षण पथकाची कारवाई

पिंपरी : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर तपासणी सुरु आहे. विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामध्ये निगडी येथे सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथकांच्या नेमणुका केल्या आहेत. यातील एका पथकाने ही कारवाई बुधवारी (१ मे) केली.

अधिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजता निगडी येथील सर्वेक्षण पथकाने एका वाहनाची तपासणी केली. या वाहनामध्ये असणारी रोख रक्कम २९ लाख ५० हजार आढळून आली. चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसून आले. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा केला आहे.

Web Title: In the wake of the Lok Sabha elections, cash of 29 lakhs was seized, the action of the survey team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.