SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठगाल करताना सनरायझर्स हैदराबादची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली आहे. त्यामुळे संघ मालकीण काव्या मारन हिच्यासह हैदराबादच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातच एक मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली आहे आणि तिची ओळख पटताच अनेंकाची झोप उडाली आहे.

विराट कोहलीने सातत्य कायम राखताना आणखी एक अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्याचा स्ट्राईक रेट ११८ च्या आसपास असल्याने RCB च्या धावांचा वेग मंदावला. रजत पाटीदारने २० चेंडूंत ५० धावा चोपून काढताना RCB ला आशेचा किरण दाखवला होता. पण, SRH चा अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकटने ( ३-३०) स्लोव्हर चेंडूचा मारा करून विराट व रजत यांना चतुराईने बाद केले.

रजत व विराट यांनी ३४ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. रजतने २० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५० धावा केल्या. विराटने ४३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ५१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने २० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, तर इम्पॅक्ट प्लेअर स्वप्निल सिंगने ( १२) धावा करून संघाला ७ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले.

सनरायझर्सला अपेक्षित सुरुवात नाही मिळाली. ट्रॅव्हिस हेड ( १) पहिल्याच षटकात माघारी परतला. अभिषेक शर्मा १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर झेलबाद झाला. इम्पॅक्ट खेळाडू स्वप्निल सिंगने त्याच्या पहिल्याच षटकात एडन मार्करम ( ७) व हेनरिच क्लासेन ( ७) यांच्या विकेट मिळवल्या.

स्वप्निलच्या त्या षटकात १९ धावा आल्या, परंतु त्याने दोन महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. आयपीएलमध्ये आतपर्यंत SRHला एकदाच २००+ धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे, तर १२ वेळा पराभव पत्करावा लागला आहे. कर्ण शर्माने त्याच्या पहिल्या षटकात नितिश कुमार रेड्डीचा ( १३) त्रिफळा उडवून हैदराबादचा निम्मा संघ ६९ धावांत तंबूत पाठवला.

कर्ण शर्माने त्याच्या पुढच्या षटकात अब्दुल समदला ( १०) बाद करून हैदराबदला ८५ धावांवर सहावा धक्का दिला आणि ही अवस्था पाहून मिस्ट्री गर्ल चकीत झाली. राशी सिंग असे या मिस्ट्री गर्लचे नाव आहे.

राशी सिंग ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तेलगू सिनेमातून तिच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. राशी सिंगची ऑन-स्क्रीन उपस्थिती आणि अष्टपैलुत्व यांनी लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामुळे ती इंडस्ट्रीमध्ये एक उल्लेखनीय व्यक्ती बनली आहे.