सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

By मारोती जुंबडे | Published: April 26, 2024 04:22 PM2024-04-26T16:22:28+5:302024-04-26T16:22:55+5:30

दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले आहे

Queues of voters from 7 am; Highest polling in Gangakhed Constituency 47 percent | सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

परभणी: परभणी: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता पासून सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले. सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक गंगाखेडात ४७.१५ टक्के मतदान झाले 

राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली असून, दुपारच्या उन्हाचा तडाका पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदान रांगा लावायला सुरुवात केली आहे. ३ वाजेपर्यंत सर्वच केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या मतदार संघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. पहिल्या २ तासात ९.७२ टक्के मतदान झाले. तर ७ ते ११ या चार तासात २१.७७ टक्के मतदान झाले होते. तर सकाळी ११ ते दुपारी १ या सहा तासात  ३३.८८ टक्के मतदान झाले. तर आठ तासात ४४.४९ टक्के मतदान झाले. यामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४७.१५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.

या मतदानावरून लोकसभा मतदारसंघात मतदारांचा मतदानामध्ये उत्साह दिसून येत आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते ३ या वेळेत ४५ टक्के, परभणी ४४.१५, गंगाखेड ४७.१५, पाथरी विधानसभा ४४.५६, परतूर विधानसभा मतदारसंघात ४३.२५ तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ४१.९५ टक्के मतदान झाले आहे. या सहा विधानसभा मतदारसंघात आठ तासात मतदानाची टक्केवारी वाढतांना दिसून आली.

१६१७ जणांनी बजावला घरबसल्या मतदानाचा हक्क
 ८५ वर्षावरील नागरिक व दिव्यांगांना मतदान केंद्रावर येणे अडचणीचे ठरू नये, यासाठी यंदा प्रथमच आठराव्या लोकसभेसाठी परभणीत जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील १६२९ मतदारांपैकी १६१७ जणांनी घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Queues of voters from 7 am; Highest polling in Gangakhed Constituency 47 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.