पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:16 AM2024-04-20T07:16:15+5:302024-04-20T07:17:36+5:30

नागालॅंडमध्ये सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

Polling decreased in the first phase Who is affected by low turnout Zero percent polling in six districts | पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात लाेकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. गेल्यावेळी म्हणजे २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर मतदान झाले हाेते. त्यासाठी ६९.५८ टक्के मतदान झाले हाेते. यावेळी १०२ जागांवर मतदान झाले. मात्र, मतदान घटून ६० टक्क्यांवर आले आहे.
  
दरम्यान,  वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ईनपीओ) या राज्यातील सात आदिवासी संघटनांच्या शिखर संस्थेने अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या बंदमुळे शुक्रवारी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांतील मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळाला. सहा जिल्ह्यांतील ७३८ मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी तैनात करण्यात आले होते. तेथे नंतरही मतदान झाले नाही.

आदिवासींनी प्रथमच केले मतदान
पाेर्ट ब्लेअर : अंदमान आणि निकाेबार द्वीपसमुहातील ‘शाेम्पेन’ आदिवासीनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. ही आदिवासी जमाति विशेष संरक्षित जमातिंच्या प्रवर्गात येत. त्यातील ७ जणांनी मतदान केले.

निवडणूक आयाेगाने त्यांच्यासाठी वनविभागाच्या निवासी क्षेत्रात स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात आले हाेते. त्यांना यापूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत माहिती देण्यात आली हाेती. या जमातिच्या केवळ २२९ नागरिकांची नाेंद आहे. त्यापैकी ९८ जण मतदार आहेत. 

ईव्हीएमसह एसएसयूव्ही पाण्यात बुडाली
- उत्तर लखमीपूर : मतदान झाल्यानंतर ईव्हीएम नेणारी एक एसयुव्ही नदीत बुडाली. ही गाडी एका बाेटीतून पैलतीरी नेण्यात येत हाेती. मात्र, पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे बाेट उलटली. 
- वाहनचालक आणि निवडणूक अधिकारी वेळीच वाहनातून बाहेर पडल्यामुळे बचावले.
- अमरपूर भागात हे पथक बिघडलेले ईव्हीएम बदलण्यासाठी जात हाेते. 

आराेग्य, पाणी अन् शिक्षणासाठी ‘मूक’ गावाचे मतदान
- देशातील ‘मूक’ गाव म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मीरमधील ढडकही या गावाने चांगल्या आराेग्य सुविधा, पाणी, रस्ते आणि शिक्षणासाठी मतदान केले. 
- त्याचवेळी गावकऱ्यांनी या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढच्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला आहे.
- गावातील सुमारे ९० टक्के कुटुंबातील लाेक मूकबधीर आहेत. उधमपूर मतदारसंघात येणाऱ्या ढडकहीत ३५ टक्के लाेकसंख्या मतदार आहे .

Web Title: Polling decreased in the first phase Who is affected by low turnout Zero percent polling in six districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.