'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:35 PM2024-04-30T15:35:42+5:302024-04-30T15:36:00+5:30

Yogi Adityanath In West Bengal: 'पश्चिम बंगालमध्ये हिंदू संस्कृती पायदळी तुडवण्याचे प्रयत्न.'

Lok Sabha Elections 2024: 'If it was in UP, it would have been hung upside down...', CM Yogi Adityanath's attack | 'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

Yogi Adityanath West Bengal Visit : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सर्व प्रमुख नेते देशभरात प्रचारसभा घेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या बहरामपूरमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केला. पश्चिम बंगालचे दंगलखोर उत्तर प्रदेशात असते, तर त्यांना उलटं टांगून असा धडा शिकवला असता, जो त्यांच्या सात पिढ्या विसरू शकले नसते, असे योगी म्हणाले.

पश्चिम बंगाल सरकारने दंगलखोरांवर कारवाई का केली नाही? आज बंगालमध्ये रक्तपात होतोय होत आणि सरकार दिशाहीन आहे. ज्या बंगालने देशाला राष्ट्रगीत दिले, ज्या बंगालने आपल्याला गर्वाने हिंदू म्हणायला शिकवले, त्याच बंगालमध्ये हिंदू संस्कृती पायदळी तुडवण्याचे कसे प्रयत्न केले जाताहेत. संदेशखलीसारख्या घटना बंगालमध्ये कशा घडतात, हा प्रश्न मी बंगाल सरकारला विचारण्यासाठी आलोय. आजचा बंगाल हा सोनार बांगला नाही, ज्याची कल्पना स्वातंत्र्यसैनिकांनी केली होती. बंगालला दंगलीच्या आगीत ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंगाल एका षड्यंत्राचा बळी ठरत आहे, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली.

'यूपीमध्ये 7 वर्षांत एकही दंगल नाही'
योगी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि टीएमसी एकाच नाण्याच्या दोन बाजू नआहेत. दोन्ही पक्ष बंगालला लुटण्यात एकवटले आहेत. बंगालमध्ये आज रक्तपात होतोय. सात वर्षांपूर्वी यूपीचीही अशीच स्थिती होती. आज तुम्ही युपीत पाहा, गेल्या सात वर्षांत एकदाही दंगल घडली नाही, कर्फ्यू लागला नाही. ज्या बंगालमधून स्वामी विवेकानंदांनी 'गर्वाने बोला आम्ही हिंदू आहोत' असा संदेश दिला, आज त्याच बंगालमध्ये हिंदूंना हद्दपार करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

यूपीमध्येही नवरात्रीच्या निमित्ताने माँ दुर्गेची पूजा केली जाते, मोठमोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, पण कधीच रामनवमी आणि नवरात्रीला दंगल होत नाही. मात्र, पश्चिम बंगालमध्ये बैसाखी आणि रामनवमीसारख्या सणांच्या दिवशी दंगली का होतात?, असा प्रश्नही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीविचारला.

Web Title: Lok Sabha Elections 2024: 'If it was in UP, it would have been hung upside down...', CM Yogi Adityanath's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.