भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:55 PM2024-04-18T18:55:30+5:302024-04-18T18:55:51+5:30

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी सुरक्षारक्षकांना त्या टेम्पोला धक्का मारण्यास लावले तरी देखील तो चालू होत नव्हता.

BJP's campaign car stopped! The MP's Chief Minister Mohan Yadav got upset, got down and left in the car Bhind loksabha | भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले

भाजपच्या प्रचाररथाची गाडी बंद पडली! मुख्यमंत्री नाराज झाले, उतरून कारमध्ये बसून निघून गेले

लोकसभा निवडणुकीत एकसोएक किस्से घडत असतात. असाच एक किस्सा मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत घडला आहे. भिंडमध्ये उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी यादव आले होते. वाजत गाजत रोड शो देखील काढण्यात आला. परंतु या रोड शोमधील प्रचाररथच बंद पडला. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारी सुरक्षारक्षकांना त्या टेम्पोला धक्का मारण्यास लावले तरी देखील तो चालू होत नव्हता.

यामुळे यादव यांचा रोड शो फ्लॉप झाला. दोनवेळा असा प्रसंग घडल्याने यादव नाराज झाले आणि रथावरून उतरून कारमध्ये बसून हेलिपॅडकडे रवाना झाले. रथ बंद पडल्याने संध्या राय यांचा अर्ज भरण्याच्या तामझाम सुपर फ्लॉप ठरला. अर्ज भरल्यानंतर हा रोड शो काढण्यात आला होता. या रथावर मोदींचे फ्लेक्स लावण्यात आले होते. 

रथाचा टेम्पो बंद पडल्याने एवढ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या रथाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. परंतु रथ काही पुढे सरकत नव्हता. यामुळे नाराज मुख्यमंत्री तिथून निघून गेले. पुढील चौकात रथावरूनच यादव हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. ते देखील रद्द झाले. संध्या राय य़ांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. परंतु पत्रकारांनी आपल्याकडे व्हिडीओ असल्याचे सांगताच त्यांचा सूर बदलला आणि अशा काही तांत्रिक अडचणी येतात, अशी सारवासारव केली. 

संध्या राय यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी आणखी एक किस्सा घडला आहे. भिंडमध्ये भाजपकडून संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला कार्यकर्तेच जमले नाहीत. यामुळे राय यांनी तिथे जाणे टाळले होते. अशाप्रकारे राय यांच्याबाबतीत फ्लॉप शोचा हा दुसरा प्रकार घडला आहे.  

Web Title: BJP's campaign car stopped! The MP's Chief Minister Mohan Yadav got upset, got down and left in the car Bhind loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.