"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"

By संजय पाठक | Published: May 1, 2024 11:55 AM2024-05-01T11:55:10+5:302024-05-01T11:56:08+5:30

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन, भाजपा नाराजी मात्र पाडापाडी करणार नाही 

Loksabha Election - "Yes, Chhagan Bhujbal's name was proposed but in compromise this seat went to Shiv Sena" BJP Chandrasekhar Bawankule | "होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"

"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"

नाशिक- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना  लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मधून उमेदवारी द्यावी याबाबत चर्चा झाली होती हे मान्य करतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा शिंदे कडे गेल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समवेत 13 खासदार माहिती दाखल झाले होते नाशिकची जागा शिंदे कडे असल्यामुळे साहजिकच ही जागा तडजोडीत त्यांच्याकडे गेली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे कालपासून नाशिकच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

छगन भुजबळ हे महायुतीतील तिसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ओबीसी समाज नाराज असला तरी कार्यकर्त्यांचे कार्यकर्त्यांची ते समजूत काढत आहेत बूथ स्तरापर्यंत त्यांनी तसा संदेश दिला आहे.नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला भुजबळ यांचा कायम पाठिंबा राहिला आहे त्यामुळे त्यांनी महायुतीच्या जागा निवडून याव्या यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांना संदेशही दिल्याचे सांगितले नाशिकचे जागा शिंदे गटाला गेल्यामुळे भाजपाच्या काही नाराज इच्छुकांनी उमेदवार  पराभूत होईल अशा प्रकारची चर्चा सुरू केली आहे या संदर्भात बोलताना बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता देण्यासाठी सर्वजण सज्ज आहे नाराजी काही काळ असते मात्र अशी पाडापाडी किंवा कोणाला पराभूत करता येत नाही असे ते म्हणाले.

नाशिकच्या जागे संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील मात्र प्रचारासाठी सतरा अठरा दिवस शिल्लक राहिल्यामुळे निकालावर परिणाम होणार नाही असे बावनकुळे म्हणाले. उद्या दिंडोरीतील भाजपाचे उमेदवार डॉ. भारती पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नाशिक मध्ये उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Loksabha Election - "Yes, Chhagan Bhujbal's name was proposed but in compromise this seat went to Shiv Sena" BJP Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.