...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:05 PM2024-04-14T18:05:51+5:302024-04-14T18:06:31+5:30

मविआकडून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

...then I will not fill the nomination form; Shashikant Shinde's refusal or challenge in Satara? Loksabha Election Politics | ...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान? 

...तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही; साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा नकार की आव्हान? 

साताऱ्यामध्ये अद्याप महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. छत्रपती उदयनराजे भोसले हे दावेदार आहेत. असे असले तरी मविआकडून शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे आरोपाचे पुरावे देतो, दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान महायुतीला दिले आहे.

कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर वाशी येथील एपीएमसीच्या गाळे विक्रीत तब्बल ४००० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदाराला आव्हान दिले आहे. 

मविआकडून मी उद्या अर्ज भरणार आहे. शरद पवार उपस्थित असणार असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर मी यात दोषी आढळलो तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे आव्हान शिंदे यांनी दिले आहे. 

याचबरोबर आपल्या विरोधात उमेदवार जाहीर होत नसल्यावरून देखील त्यांनी महायुतीवर टीका केली आहे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान करायचाच होता तर भाजपाने त्यांचे नाव अद्याप जाहीर का केले नाही, असा सवाल शिंदे यांनी केला आहे. छत्रपतींच्या गादीच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्यांनी छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. 
 

Web Title: ...then I will not fill the nomination form; Shashikant Shinde's refusal or challenge in Satara? Loksabha Election Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.