फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

By विश्वास पाटील | Published: April 29, 2024 07:32 PM2024-04-29T19:32:31+5:302024-04-29T19:33:24+5:30

शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन

The image of Maharashtra is tarnished due to the politics of vandalism, Criticism of dignitaries from various fields in Kolhapur | फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

कोल्हापूर : पैसा आणि पक्षफोडीच्या आधारे सत्ता काबीज करणारे विधीनिषेधशून्य नेते यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा राजकीय नैतिकता गमावलेले राज्य अशी मलीन झाल्याची टीका ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह कोल्हापुरातील चाळीस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोमवारी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या मान्यवरांनी लोकसभा निवडणूकीत कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकात म्हटले आहे, भारतातील क्रांतीकारक सामाजिक सुधारणांचा इतिहास असलेले प्रगत व सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख होती. परंतू ती आज मलिन झाली आहे. भारतीय जनता पक्ष हा आज निवडणूक आयोगाला स्वत:च्या अंकित ठेवून लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या निवडणूकांवर नियं६ण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्याविरोधात आता निर्भय बनून खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. एक विवेकी, लोकशाहीवादी व्यक्ती म्हणून देशातील लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. 

लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक घटना आहे. आता आपण जागे नाही झालो तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे त्यात म्हटले आहे. पत्रकावर डॉ.यशवंत थोरात, डॉ. गणेश देवी, डॉ.अशोक चौसाळकर, सरोज पाटील, डॉ.उषा थोरात, डॉ. सुनिलकुमार लवटे, डॉ. राजन गवस, डॉ.मधुकर बाचूळकर, डॉ.टी.एस.पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ. विलास पोवार, सुरेश शिपूरकर, डॉ. शरद भुथाडिया, पवन खेबूडकर, डॉ.माया पंडित, डॉ.शरद नावरे डॉ.अरुण भोसले, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ..मेघा पानसरे, डॉ. मंजूश्री पवार, मीना सेशू, तनुजा शिपूरकर बाळ पाटणकर.

डॉ.आय.एच.पठाण, व्यंकप्पा भोसले, हसन देसाई, गणी आजरेकर, एम.बी.शेख, प्रा.डी.यू.पवार, प्रसाद कुलकर्णी, हिंदकेसरी विनोद चौगले, माणिक मंडलिक, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, डॉ.उदय नारकर, अर्जुन देसाई, अनंत घोटगाळकर, भगवान चिले आदींच्या सह्याआहेत.

Web Title: The image of Maharashtra is tarnished due to the politics of vandalism, Criticism of dignitaries from various fields in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.