कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:52 PM2024-04-20T16:52:16+5:302024-04-20T16:52:32+5:30

शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी भरला अर्ज : सोमवारी माघारीची मुदत

Applications of 28 people in Kolhapur Lok Sabha constituency and 36 in Hatkanangle | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघातील २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला.

आज शनिवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. माघारीनंतरच दोन्ही मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १६ जणांनी अर्ज दाखल केले.

छाननी आज..

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची आज शनिवारी छाननी होणार आहे. छाननीत किती अर्ज राहतात, कुणाचे अर्ज वैध, अवैध ठरतात याकडे सर्वच पक्षांंसह कार्यकर्त्यांचेही लक्ष लागले आहे.

माघारीसाठी फिल्डिंग..

उमेदवारांना सोमवारी (दि. २२) दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दोन्ही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यात काही उमेदवार हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या व्होट बँकेला धक्का पोहचवू शकतात. त्यामुळे अशा बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची कसोटी लागणार आहे. गत निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १५ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते.

कोल्हापूर लोकसभा
उमेदवार २८, नामनिर्देशनपत्र -४२

हातकणंगले
उमेदवार- ३६, नामनिर्देशनपत्र -५५

कोल्हापुरात शेवटच्या दिवशी १३ जणांचे अर्ज

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी १३ उमेदवारांनी १४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये अरविंद भिवा माने (भारतीय राष्ट्रीय दल), संजय भिकाजी मागाडे (बहुजन समाज पार्टी) व अपक्ष म्हणून मुश्ताक अजीज मुल्ला, बाजीराव नानासो खाडे, माधुरी राजू जाधव, ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, कृष्णाबाई दीपक चौगले, मालोजीराजे छत्रपती, सुभाष वैजू देसाई, इरफान आबुतालिब चांद, राजेंद्र बाळासो कोळी, मंगेश जयसिंग पाटील, कुदरतुल्ला आदम लतीफ यांचा समावेश आहे.

हातकणंगलेत १६ जणांचे अर्ज

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी १६ उमेदवारांनी २२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यात महम्मद मुबारक दरवेशी, बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र तुकाराम कांबळे, स्वाभिमानीकडून राजू ऊर्फ देवापान्ना शेट्टी, कामगार किसान पार्टीचे संतोष केरबा खोत, अपक्ष म्हणून सत्यजीत बाळासो पाटील, अरविंद भिवा माने, राजेंद्र भीमराव माने, धैर्यशील संभाजी माने, अस्लम ऐनोद्दीन मुल्ला, लक्ष्मण शिवाजी तांदळे, विश्वास आनंदा कांबळे, वेदांतिका धैर्यशील माने, परशुराम तमन्ना माने, अस्मिता सर्जेराव देशमुख, शरद बाबुराव पाटील, जावेद सिकंदर मुजावर, सुनील विलास अपराध, आनंदराव वसंतराव सरनाईक, दिनकरराव तुळशीदास चव्हाण, श्रीमती गोविंदा डवरी यांचा समावेश आहे.

कोल्हापूर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

  • संजय मंडलिक-महायुती
  • शाहू छत्रपती -महाविकास आघाडी


हातकणंगले मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

  • धैर्यशील माने -महायुती
  • राजू शेट्टी -स्वाभिमानी शेतकरी संघटना
  • सत्यजित पाटील-सरुडकर-महाविकास आघाडी
  • डी.सी.पाटील-वंचित बहुजन आघाडी
  • रघुनाथ पाटील -भारतीय जवान किसान पार्टी

Web Title: Applications of 28 people in Kolhapur Lok Sabha constituency and 36 in Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.