कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

By मुरलीधर भवार | Published: May 9, 2024 06:31 PM2024-05-09T18:31:50+5:302024-05-09T18:32:51+5:30

अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना १२ ड मधील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

house polling begins in kalyan lok sabha constituency from may 10 | कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

कल्याण लोकसभा मतदार संघात १० मे पासून गृह मतदानाला प्रारंभ

मुरलीधर भवार, कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघ अंतर्गत गृह मतदानाला (होम वोटिंग) उद्या १० मे पासून सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 85 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग, मतदारांना त्यांची इच्छा असल्यास त्यांच्या घरी टपाली मतदान, गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना १२ ड मधील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी प्राप्त झालेल्या अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. मंजूर अर्जांच्या यादीनुसार खालील विधानसभा निहाय मतदार संघाद्वारे 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान घेण्यात येणार आहे. विधानसभा मतदार संघानुसार अंरनाथमध्ये ८५ वर्षापैक्षा जास्त मतदार ६३ तर दिव्यांग मतदार २१ आहेत. उल्हासनगरात ८५ वर्षेपेक्षा जास्त वयाचे मतदार ३४ तर दिव्यांग मतदारांची संख्या ८ आहे. कल्याण पूर्वेत ८५ वर्षापेक्षा जास्त वयोमान असलेले ३० तर दिव्यांक ४ मतदार आहेत. डोंबिवलीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार ७९ तर दिव्यांग मतदारांची संख्या ४ आहे.

कल्याण ग्रामीणमध्ये ८५ वर्षाचे २८ तर दिव्यांग मतदारांची संख्या ५ आहे. कळव्या मुंब्रा मतदार संघात ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १६ तर दिव्यांगाची संक्या ५ आहे. याकरिता मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी नेमण्यात आले आहेत. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. याबाबत सर्व उमेदवार यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र देखील देण्यात आली आहेत. गृह भेटीसाठी विधानसभा मतदार संघानुसार अंबरनाथमध्ये १०, उल्हासनगरात ४, कल्याण पूर्वेत ३, डोंबिवलीत १०, कल्याण ग्रामीणमध्ये ३ आणि कळवा मुंब्रा येथे २ पथके नेमली आहेत. या कामाकरीता केंद्रीय निवडणूक आयोगाने ३२ सूक्ष्म निरीक्षक नेमले आहेत. या सर्व प्रक्रियेचे विडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. १० मे रोजी गृह मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार असून त्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

Web Title: house polling begins in kalyan lok sabha constituency from may 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.