'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:25 AM2024-04-27T10:25:58+5:302024-04-27T10:26:51+5:30

'जुनं फर्निचर' निमित्त महेश मांजरेकरांनी 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.

Mahesh Manjrekar revealed he offered Salman Khan a role in Juna furniture after its done by Upendra Limaye | 'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा

'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित आणि अभिनीत 'जुनं फर्निचर' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आईवडिलांना गृहित धरणाऱ्या मुलाला एक बाप कसा धडा शिकवतो याची कहाणी सिनेमात मांडण्यात आली आहे. यामध्ये महेश मांजरेकर म्हाताऱ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत तर भूषण प्रधान मुलाच्या भूमिकेत आहे. मुलाविरोधात बाप थेट कोर्टात जातो हा सिनेमाचा इंटरेस्टिंग भाग आहे. सिनेमानिमित्ताने महेश मांजरेकर यांनी 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला.

महेश मांजरेकर आणि सलमान खान (Salman Khan) यांची जुनी मैत्री आहे. तसंच सलमानचे वडील सलीम खान यांच्याशीही मांजरेकर कुटुंबाची ओळख आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये सलमानने भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना महेश मांजरेकरांनी एक खुलासा केला. 'जुनं फर्निचर' मध्ये उपेंद्र लिमयेच्या भूमिकेसाठी आधी सलमान खानला विचारणा केल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "उपेंद्र लिमयेच्या भूमिकेसाठी आधी मी त्याला विचारलं होतं. त्याला प्रचंड आवडलेला सिनेमा आहे. तो हो ही म्हणालेला. पण... आत्ता ईदच्या दिवशी मी गेलेलो त्याच्याकडे तेव्हाही मला म्हणाला 'कब दिखा रहा है पिक्चर?' सलीम साहेब माझे पिक्चर बघतात. त्यांची  छान गँग असते.त्यामुळे सलीम खान लवकरच सिनेमा पाहणार आहेत."

सलमान खानच्या 'अंतिम' या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलं होतं. तर 'दबंग','वाँटेड' सिनेमात मांजरेकरांनी छोट्या भूमिका साकारल्या होत्या. तसंच मांजरेकरांची लेक सई मांजरेकरने सलमान खानच्याच 'दबंग 3' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मांजरेकर आणि खान कुटुंबात सिनेमापलीकडची मैत्री आहे.

Web Title: Mahesh Manjrekar revealed he offered Salman Khan a role in Juna furniture after its done by Upendra Limaye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.