या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 06:54 PM2020-02-07T18:54:03+5:302020-02-07T18:54:30+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याच कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे.

Ayesha Takia Azmi Shared Her Childhood Photo | या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो

या अभिनेत्रीसोबत सलमान खानने केलाय रोमान्स, सोशल मीडियावर व्हायरल होतोय बालपणीचा फोटो

googlenewsNext


बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया बऱ्याच कालावधीपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आयशा टाकिया सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी ती एका स्पेशल पोस्टमुळे चर्चेत आली आहे.


आयशा टाकियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आयशाने लिहिले की, जेव्हा मी छोटी मुलगी होती. तिच्या या बालपणीच्या फोटोला खूप लाइक्स मिळत आहेत.



वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती.


आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केले आहे. तिने करियरची सुरूवात २००४ साली टारझन द वंडर कार चित्रपटातून केली. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पहायला मिळाली.२००९ मध्ये फरहान आजमीसह लग्नबंधनात अडकत तिच्या आयुष्यात बिझी झाली.

आयशाचा शेवटचा चित्रपट मोड होता. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणविजय सिंग मुख्य भूमिकेत होता. आयशा टाकियाची गिनती बॉलिवूडमधील अयशस्वी अभिनेत्रींमध्ये होते.  

Web Title: Ayesha Takia Azmi Shared Her Childhood Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.