आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:36 PM2024-04-24T16:36:35+5:302024-04-24T16:37:03+5:30

whatsapp join usJoin us
We are rich people, we don't go to poor countries, Former India cricketer Virender Sehwag revealed he was once offered a contract by a BBL franchise  | आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद

आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) त्याच्या आक्रमक शैलीमुळे ओळखला जातो. वीरूने क्रिकेटचे मैदान दणाणून सोडले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर तो समालोचन करतानाही अनेकांची बोलती बंद करताना दिसतोय. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावून इतिहास रचला होता आणि अशा स्फोटक फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या बीग बॅश लीगमध्ये खेळण्याची ऑफरही मिळाली होती. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले, परंतु त्याने त्यास नकार दिला होता. 

हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले

 भारतीय खेळाडू बीग बॅश लीगमध्ये खेळताना दिसतील का, असा प्रश्न गिलख्रिस्टने वीरूला केला. त्यावर त्याने गमतीशीर शैलीत उत्तर दिले, भारतीय क्रिकेटपटूंकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे त्यांना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची गरज नाही. 


ॲडम गिलख्रिस्ट: भारतीय खेळाडू इतर ट्वेंटी-२० लीग खेळतील, अशी वेळ येईल असे तुम्हाला वाटते का?  


वीरेंद्र सेहवाग: "नाही, गरज नाही. आम्ही श्रीमंत लोक आहोत, आम्ही गरीब देशांमध्ये जात नाही (हसतो)". 


सेहवागने नंतर बीबीएलचा मोठा करार नाकारला तेव्हाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला,''नाही, गरज नाही, आम्ही श्रीमंत लोक आहोत, आम्ही इतर लीगसाठी गरीब देशांमध्ये जात नाही. मला अजूनही आठवते जेव्हा मला भारतीय संघातून वगळण्यात आले, मी आयपीएल खेळत होतो, तेव्हा मला बीबीएलकडून ऑफर आली होती. मी म्हणालो ठीक आहे किती पैसे, ते म्हणाले $100,000. एवढे पैसे मी माझ्या सुट्टीत खर्च करतो असे मी त्यांना सांगितले. अगदी काल रात्रीचे बिल $100,000 पेक्षा जास्त होते."

 

Web Title: We are rich people, we don't go to poor countries, Former India cricketer Virender Sehwag revealed he was once offered a contract by a BBL franchise 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.