'डग आऊट' मधून खुणवाखुणवी महागात पडली; टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड यांच्यावर कारवाई

मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर आलेली दिसतेय, परंतु त्यांच्या मार्गात दिवसेंदिवस नवीन संकट उभी राहताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:59 PM2024-04-20T14:59:18+5:302024-04-20T14:59:58+5:30

whatsapp join usJoin us
Tim David & Kieron Pollard have fined 20% of their match fees for breaching the IPL code of conduct during the match against Punjab Kings. | 'डग आऊट' मधून खुणवाखुणवी महागात पडली; टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड यांच्यावर कारवाई

'डग आऊट' मधून खुणवाखुणवी महागात पडली; टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड यांच्यावर कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, PBKS vs MI : मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर आलेली दिसतेय, परंतु त्यांच्या मार्गात दिवसेंदिवस नवीन संकट उभी राहताना दिसत आहेत. RCB विरुद्ध टॉसच्या झोलचे प्रकरण, पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत डग आऊटमधून केलेली खुणवाखूणवी, यावरून मुंबई इंडियन्सवर टीका होत आहे. त्यात आता टीम डेव्हिड ( Tim David ) आणि किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात डग आऊटमध्ये बसलेला टीम डेव्हिड हा फलंदाजी करत असलेल्या सूर्यकुमार यादव याला वाईड चेंडूसाठी DRS घेण्यासाठी खुणावत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफनेही अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच फलंदाज डेव्हिड व फलंदाज प्रशिक्षक पोलार्ड यांच्यावर आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. 


नेमके काय घडले होते 
१. अर्शदीप सिंगने ऑफ साईडच्या दिशेने सूर्यासाठी चेंडू टाकला
२. तेव्हा अम्पायरने काहीच निर्णय दिला नाही
३. पण, मुंबई इंडियन्सच्या डग आऊटमध्ये प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी वाईड असल्याचे सूचित केले
४. त्याने फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी ही सूचना केली होती, परंतु त्याचे त्याकडे लक्ष नव्हते
५. त्याच्याच बाजूला बसलेल्या टीम डेव्हिडने मग DRS घेण्याची हिंट दिली... मोठ्या स्क्रीनवर हे दिसत असल्याचे कळताच त्याने हात मागे घेतला
६. पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम कुरन याबाबत अम्पायरकडे तक्रारही केली, तरीही अम्पयारने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली
७. मुंबई इंडियन्सने नियमांचे उल्लंघन करून DRS घेतला..

आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२० नुसार "टीव्ही अम्पायरला रेफरलची विनंती करायची की नाही हे ठरवण्यासाठी खेळाच्या मैदानाबाहेरील कोणत्याही व्यक्तीकडून मदत घेण्यास" मनाई आहे. पोलार्ड आणि डेव्हिड या दोघांनी लेव्हल १ ची चूक केली आहे. या दोघांनाही त्यांच्यात्यांच्या मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.  

Web Title: Tim David & Kieron Pollard have fined 20% of their match fees for breaching the IPL code of conduct during the match against Punjab Kings.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.