MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला पाहण्यासाठी आजही स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने गर्दी होतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 05:48 PM2024-05-05T17:48:36+5:302024-05-05T17:49:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : Harshal Patel given the respect to MS Dhoni as he didn't celebrate his wicket, he said "I have a lot of respect for MS Dhoni, that's why didn't celebrate", Video  | MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं

MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याला पाहण्यासाठी आजही स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने गर्दी होतेय. भारताचा माजी कर्णधार फक्त आयपीएल खेळत असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही सुवर्णसंधी असते... पण, गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे माही वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाही. पण, तो काही चेंडू जरी खेळायला मैदानावर आला तरी स्टेडियम दणाणून जाते आणि कॅप्टन कूलही फटकेबाजी करून चाहत्यांना निराश करत नाही. पण, आज धर्मशालाच्या चाहत्यांना तो क्षण अनुभवता आला नाही. हर्षल पटेलच्या स्लोव्हर यॉर्करने पहिल्याच चेंडूवर माहिचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियम शांत झाले. 


CSK च्या फलंदाजीचा भार ऋतुराज गायकवाड, डॅरिल मिचेल व रवींद्र जडेजा यांनी उचललेला पाहायला मिळाला. अजिंक्य रहाणे ( ९)  सलामीला पाठवण्याचा CSK चा डाव पुन्हा फसला.  गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी करून संघाला ७ षटकांत १ बाद ६९ धावांपर्यंत पोहोचवले. स्ट्रॅटेजिक ब्रेकनंतर राहुल चहरने CSK ला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले. ऋतुराज ३२ धावांवर झेलबाद झाला, तर शिवम दुबे गोल्डन डक ठरला. हर्षल पटेलने CSK चा सेट फलंदाज मिचेलला ( ३०) पायचीत केले. मोईन अली ( १७) मोठी खेळी करू शकला नाही आणि मिचेल सँटनर ( ११) लगेच माघारी परतला. शार्दूल ठाकूरने १७ धावा केल्या, पण महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.  जडेजा २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला.  चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या.
हर्षल पटेल ( ३-२४) व राहुल चहर ( ३-२३) यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर अर्शदीप सिंगने दोन व सॅम करनने एक विकेट घेतली. 

हर्षल पटेलने जिंकली मनं...
इनिंग्जनंतर हर्षल पटेल म्हणाला,मी विकेटचा चुकीचा अंदाज लावला होता, मी आधी म्हटले की ही चांगली खेळपट्टी आहे. पण, ती थोडी ड्राय आहे. आम्ही हार्ड लेंथवर जो चेंडू मारत होतो, तो वेगाने जात नव्हता. ही संथ विकेट नक्कीच आहे. 
धोनीला बाद केल्यावर सेलिब्रेशन का केलं नाही? हर्षल म्हणाला, मी त्याला आऊट केल्यावर सेलिब्रेशन केलं नाही. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे.  


 

Web Title: IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : Harshal Patel given the respect to MS Dhoni as he didn't celebrate his wicket, he said "I have a lot of respect for MS Dhoni, that's why didn't celebrate", Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.