KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:47 PM2024-04-23T19:47:22+5:302024-04-23T19:48:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : What a flying catch that was from KL Rahul, Ajinkya Rahane failed again, CSK in early trouble, Video | KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात

KL Rahul चा अद्भुत कॅच! चेन्नई सुपर किंग्स सहाव्या चेंडूवर संकटात; पण, यश ठाकूरने केला घात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना हा प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या दोन्ही संघ ७ सामन्यांत ४ विजयांसह ८ गुणांसह तालिकेत मागे पुढे आहेत. आज जो संघ जिंकेल तो अव्वल चारमधील आपली जागा मजबूत करेल.  या सामन्यात अजिंक्य रहाणे विरुद्ध कृणाल पांड्या आणि क्विंटन डी कॉक विरुद्ध दीपक चहर असा सामना पाहायला मिळेल. CSK vs LSG असे चार सामने झाले आणि त्यात लखनौने २ विजय मिळवले आहेत, १ लढत चेन्नईच्या बाजूने झुकली आहे. 

Milestones Alert:

  • मोईन अलीला ( ९९) ट्वेंटी-२० मध्ये शंभर झेल पूर्ण करण्यासाठी एका झेलची गरज आहे.
  • एमएस धोनीला २५० आयपीएल षटकार पूर्ण करण्यासाठी तीन षटकारांची आवश्यकता आहे.
  • मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांना आयपीएलमध्ये LSG साठी पन्नास षटकार पूर्ण करण्यासाठी चार षटकार आवश्यक आहेत.
  • शिवम दुबेला IPL मध्ये CSK साठी १००० धावा पूर्ण करण्यासाठी ४८ धावांची गरज आहे.

 

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रचीन रविंद्रच्या जागी डॅरिल मिचेल खेळणार आहे. अजिंक्य रहाणे व ऋतुराज गायकवाड हे सलामीला आले. अजिंक्यचा ( १) बॅड पॅच याही सामन्यात सुरू राहिला आणि मॅट हेनरीच्या पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलने अद्भुत झेल घेतला. मोहसिन खानच्या दुसऱ्या षटकात LSG ला दुसरे यश मिळाले असते, परंतु यश ठाकूरने CSK च्या डॅरिल मिचेलचा सोपा झेल टाकला. 

 

Web Title: IPL 2024, Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Live : What a flying catch that was from KL Rahul, Ajinkya Rahane failed again, CSK in early trouble, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.