मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

By सोमनाथ खताळ | Published: March 27, 2024 02:10 PM2024-03-27T14:10:36+5:302024-03-27T14:10:59+5:30

यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केल्याने काही काळ तणावाचे वातावरण

Pankaja Munde's car was blocked by Maratha protesters in Kaij | मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकाच्या रोशाचा सामना करावा लागला. आहे. बीडच्या केज तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यासाठी मुंडे गेल्या आसता या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी दर्शन करून पंकजा मुंडेना काढता पाय घ्यावा लागला. पंकजा मुंडे दर्शनासाठी येणार म्हणून काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी अगोदरच त्याब्यात घेतले होतें. यामुळे चिडलेल्या मराठा समाजाने तीव्र घोषणाबाजी करत गोंधळ घातला. जवळपास २० मिनीटे हा गोंधळ सुरूच होता. 

पोलिस संरक्षणात मुंडे यांची गाडी काढून देण्यात आली. दरम्यान, पावनधाम येथे सप्ताहानिमित्त मोठी गर्दी होती. यावेळी अचानक गोंधळ उडाल्याने भाविकांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची धावपळ झाली.

Web Title: Pankaja Munde's car was blocked by Maratha protesters in Kaij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.