४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:38 AM2024-05-08T06:38:30+5:302024-05-08T06:38:55+5:30

ते ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणार, झेंडे उचलायलाही कोणी नसेल - मोदी

June 4 Expiry Date of 'India Alliance': PM Modi | ४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 

अण्णा नवथर/ अविनाश मुडेगावकर
 लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर / अंबाजोगाई (जि.बीड) : ४ जूनला इंडिया आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ आहे. त्यानंतर त्यांचे झेंडे उचलायलाही कोणी राहणार नाही. एससी, एसटी, ओबीसी यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देण्याची भाषा करणारे इंडिया आघाडीवाले संविधान बदलू पाहत आहेत, असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अहमदनगर येथील जाहीर सभेत केला.

अंबाजोगाई येथील सभेत बोलताना ‘६० वर्षांपासून बंद मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला राज्य सरकारने मिशन मोडअंतर्गत विकसित करण्यास सुरुवात केली आहे. सिंचन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २७ प्रकल्प निवडले असून, काही पूर्ण होत आहेत, तर काही प्रगतिपथावर आहे, असे मोदी म्हणाले.
अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत मोदी म्हणाले, आम्ही देशातील लोकांना संतुष्ट करू पाहत आहोत. मात्र, विरोधी आघाडी तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. 

‘व्होट जिहाद’ की ‘रामराज्य’? एक निवडा
खरगोन/धार (म.प्र.) : भारत इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचला आहे आणि ‘व्होट जिहाद’ किंवा 
‘रामराज्य’ यापैकी एकाची निवड सध्याच्या लोकसभा निवडणुकीत जनतेला करायची आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी येथील प्रचारसभांत केले. 

वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून टीका 
nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रसंगी हेमंत करकरे यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्यानेच गोळी झाडली. हा अधिकारी आरएसएस समर्पित होता, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
nया प्रकरणावरून मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. ते म्हणाले, मुंबईवर २६/११चा हल्ला पाकिस्तानने केला. न्यायालयात ते सिद्ध झाले. मात्र, काँग्रेस नेत्याने कसाबची बाजू घेणारे खतरनाक वक्तव्य केले आहे. हा सर्व शहिदांचा अवमान आहे. 

त्यांनी रिबीन कापून भ्रष्टाचार केला, आम्ही संकटमुक्त करू
बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील सभेत मराठवाड्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दुष्काळाकडे लक्ष दिले नाही. केवळ रिबीन कापून भ्रष्टाचार केला. 
फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील बळीराजा जलसंजीवनी योजना इंडिया आघाडीने रोखल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसने मराठवाड्याच्या प्रश्नांची उपेक्षा केल्याचा आरोप मोदींनी केला. 
अंबाजोगाईच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांची, तर अहमदनगरच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भागवत कराड, मंत्री दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: June 4 Expiry Date of 'India Alliance': PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.