अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:11 AM2024-04-26T10:11:15+5:302024-04-26T10:11:36+5:30

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यत ६.३४ टक्के मतदान झाले. 

Voting in Amravati Lok Sabha Constituency in cloudy weather, Lok Sabha Election 2024 | अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात

अमरावती : लोकसभा मतदारसंघातील १९७५ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७ पासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. रात्रीपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी होती. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यत ६.३४ टक्के मतदान झाले. 

यामध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघात ८.१२, अमरावती ६, बडनेरा ४.५०, दर्यापूर ७.२०, मेळघाट  मतदारसंघात ४.२६ टक्के मतदान झाले. काही केंद्रावर ईव्हीएम बंद पडले ते त्वरीत बदलविण्यात आल्याचे दिसून आले. 

निवडणुकीत १८.३६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. रिंगणात ३७ उमेदवार असले तरी लढत महायुती, महाआघाडी व प्रहारचे उमेदवारात होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Voting in Amravati Lok Sabha Constituency in cloudy weather, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.