‘पोषण’चा तांदूळ जातो कुठे?, केंद्राला पडलाय प्रश्न; शालेय पोषण आहार योजनेच्या आकडेवारीचा घोळ

By अविनाश साबापुरे | Published: March 29, 2024 11:17 AM2024-03-29T11:17:05+5:302024-03-29T11:17:40+5:30

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आहार शिजवून दिला जातो.

Where does the 'nutritional' rice go?, the center has asked; A compilation of school nutrition scheme statistics | ‘पोषण’चा तांदूळ जातो कुठे?, केंद्राला पडलाय प्रश्न; शालेय पोषण आहार योजनेच्या आकडेवारीचा घोळ

‘पोषण’चा तांदूळ जातो कुठे?, केंद्राला पडलाय प्रश्न; शालेय पोषण आहार योजनेच्या आकडेवारीचा घोळ

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ रोज संपून जातो; पण रोज जेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र ५० ते ७० टक्केच असते. याबाबतचे वास्तव केंद्र सरकारच्या ‘मीड डे मील’ पोर्टलवर उघड झाले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शाळांमध्ये हा प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये पोषण आहार वाटपच होत नसल्याचे पोर्टलवरील आकडेवारी सांगते.  तर, दुसरीकडे, आम्ही सर्व विद्यार्थ्यांना जेवण देतो; मात्र आकडेवारी भरण्याबाबत विलंब होतो, असा दावा शाळांकडून करण्यात आला आहे. 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आहार शिजवून दिला जातो. हा आहार किती विद्यार्थ्यांना दिला गेला, याची संख्या रोजची रोज ‘एमडीएम’ पोर्टलवर भरणे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. रोज भरण्यात आलेली ही आकडेवारी राज्यस्तरावरून केंद्र सरकारच्या ‘ऑटोमोटेड मॉनिटरिंग सिस्टिम’वर पाठविली जाते; परंतु आता पोषण आहारासाठी पात्र असलेल्या शाळा आणि ‘ऑटोमोटेड मॉनिटरिंग सिस्टिम’वर माहिती भरणाऱ्या शाळांची पडताळणी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

शिक्षणसंचालकांनी दिले पडताळणीचे आदेश
महाराष्ट्रात २८ मार्च रोजी एकाही शाळेने पोर्टलवर पोषण आहाराची माहिती भरलेली नाही.  मागील संपूर्ण आठवडाभरात केवळ ७० टक्के शाळांनी माहिती भरली आहे. २७ मार्च रोजी केवळ ७३ टक्के शाळांनी आहार वाटप केला. याची दखल घेत केंद्राने शिक्षण संचालनालयाला विचारणा केली आहे. त्यामुळे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रत्येक शाळा रोजची माहिती रोजच भरते की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना २६ मार्चला दिले आहेत.

जिल्हा    एकूण शाळा    माहिती दिली    टक्केवारी
अहमदनगर    ४५३६    ४००७    ८८.३४
अकोला    १४१६    १०४७    ७३.९४
अमरावती    २३८२    १९७७    ८३.००
छ.संभाजीनगर    २९८६    २२१३    ७४.११
भंडारा    ११२१    ९६९    ८६.४४
बीड    ३१८२    २४२६    ७६.२४
बुलडाणा    २००६    १६२०    ८०.७६
चंद्रपूर    २००४    १५३२    ७६.४५
धुळे    १६६७    १३५३    ८१.१६
गडचिरोली    १७५६    ११०९    ६३.१५
गोंदिया    १३४०    ८५९    ६४.००
हिंगोली    १०२७    ७९९    ७७.०८
जळगाव    २७५८    २२८४    ८२.८१
जालना    १८९६    १४३२    ७५.५३
कोल्हापूर    ३०२८    २३५४    ७७.७४
लातूर    २१९८    १७०३    ७७.४८
मुंबई    ५७६    १२७    २२.००
मुंबई उपनगर    १३५४    १४४    १०.६४
नागपूर    २७२५    २१२९    ७८.१३
नांदेड    २९८४    १९०३    ६३.७७
नंदुरबार    १६९५    १९९    ११.७४
नाशिक    ४४१२    ३५४६    ८०.३७
धाराशिव    १५३२    १२५९    ८२.१८
पालघर    २३६८    १८३०    ७७.२८
परभणी    १५७८    १२५३    ७९.०४
पुणे    ५३६४    ३६३३    ६७.७३
रायगड    ३०१५    २२३८    ७४.२३
रत्नागिरी    २८४५    १९९१    ६९.९८
सांगली    २५१९    २०१२    ७९.८७
सातारा    ३४२७    २३८९    ६९.७१
सिंधुदुर्ग    १६०३    १३६८    ८५.३४
साेलापूर    ४०७१    ३०९७    ७६.०७
ठाणे    २६४३    १३२९    ५०.२८
वर्धा    १२२०    ९०३    ७४.०२
वाशिम    ११०९    ८९८    ८०.९७
यवतमाळ    २७६३    २२१६    ८०.०२
एकूण    ८५१०६    ६२१४८    ७३.०२

Web Title: Where does the 'nutritional' rice go?, the center has asked; A compilation of school nutrition scheme statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.