तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:59 PM2024-05-07T18:59:07+5:302024-05-07T18:59:47+5:30

Wardha : एसएमएसचा निवडला अनेकांनी पर्याय

Three thousand electricity consumers have saved money in their electricity bills through the Go Green scheme | तीन हजार वीज ग्राहकांनी गो ग्रीन योजनेतून वीज बिलात वाचवले पैसे

Three thousand electricity consumers have saved money in their electricity bills through the Go Green scheme

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
महावितरणच्या ग्राहकांनी वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपूरक 'गो- ग्रीन' योजनेला प्रतिसाद दिलेला आहे. या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत आहे.

महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ते 'गो-ग्रीन' योजनेतील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येत आहे. 'एसएमएस'द्वारे वीज बिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी आपला सहभाग नोंदविला असून, यात वर्धा मंडळामध्ये ३ हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई- मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.

योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
• 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झालेल्या वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीज बिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीज बिल मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.
• ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला, तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल, तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.

असे होता येईल योजनेत सहभागी
महावितरणच्या गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या करावी. याबाबतची अधिक माहिती mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली
असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

बिलाच्या रंगीत प्रिंटचीही सोय
वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई- मेलद्वारे प्राप्त झाले दर महिन्याचे वीज बिल जतन करून ठेवतात.
'गो-ग्रीन' योजना ही काळाची गरज असून, जास्तीत जास्त वीज

ग्राहकांनी कागद विरहित वीज बिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे. जिल्हाभरातील सुमारे तीन हजार ३६ ग्राहकांनी वीज बिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती देत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारला आहे.
- प्रदीप घुरुडे, प्रभारी अधीक्षक अभियंता महावितरण, वर्धा.

 

Web Title: Three thousand electricity consumers have saved money in their electricity bills through the Go Green scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.