पाच वर्षांत २,९१४ एड्स रुग्ण

By admin | Published: January 25, 2015 11:19 PM2015-01-25T23:19:27+5:302015-01-25T23:19:27+5:30

अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी

2, 9 14 AIDS sufferers in five years | पाच वर्षांत २,९१४ एड्स रुग्ण

पाच वर्षांत २,९१४ एड्स रुग्ण

Next

वर्धा : अद्यापही औषध नसलेल्या एड्सचे जिल्ह्यात पाच वर्षांत एकूण २ हजार ९१४ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती आहे. या पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण २ लाख ६९ हजार २६७ युवक व युवतींनी तपासणी केली असून त्यात या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात १९६ गरोदर मातांचा समावेश आहे.
जिल्ह्यात या संदर्भात जिल्हा रुग्णालय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय तसेच संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात एचआयव्ही चाचणी, समूपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन २००९-१० पासून २०११-१२ पर्यंत एड्स रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. २००९ च्या पूर्वी एचआयव्हीची संख्या कमी असल्याची नोंद शासन दरबारी आहे.
२००९-१० मध्ये एड्स संबंधित रुग्णांची संख्या तब्बल ७१९ असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्ह्यामध्ये २००९-१० मध्ये ७१९ रूग्ण आढळून आले होते. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ मध्ये एड्सचे ५९६ रुग्ण आढळून आले. २०११-१२ मध्ये ५५०, २०१२-१३ मध्ये ४३४, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत ३६८ तर १ एप्रिल २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत २४७ रुग्ण आढळून आले.
सन २०१४ मध्ये डिसेंबर अखेर ८७ हजार ८९६ जणांनी तपासणी केली. यात ६१५ जणांना एड्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. या काळात १ लाख २७ हजार ६६९ गरोदर मातांची एड्स तपासणी करण्यात आली. यात १९६ गरोदर मातांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी दरम्यान तीन ब्लॉक मध्ये रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी ब्लॉकचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 2, 9 14 AIDS sufferers in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.