रेल्वेमध्ये महिनाभरात मराठीचा वापर

By admin | Published: March 28, 2017 05:54 AM2017-03-28T05:54:00+5:302017-03-28T05:54:00+5:30

पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा समावेश करावा, यासाठी मराठी एकीकरण समिती पाठपुरावा करत आहे.

Use of Marathi in a month in Railway | रेल्वेमध्ये महिनाभरात मराठीचा वापर

रेल्वेमध्ये महिनाभरात मराठीचा वापर

Next

भार्इंदर : पश्चिम रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा समावेश करावा, यासाठी मराठी एकीकरण समिती पाठपुरावा करत आहे. आंदोलन करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही. चार महिन्यांपासून काम सुरू आहे. याकरिता एक कोटीची तरतूद केली असून अधिक निधीसाठी प्रयत्न सुरू आहे. महिनाभरात कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
मराठीला प्राधान्य मिळावे, यासाठी समितीने १९ एप्रिलला विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेत समितीच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी बोलवून चर्चा केली. स्थानकांची चुकीची नावे, मराठीला सूचना फलकांवर स्थान नाही, स्थानकांवर मराठीला डावलले जात असल्याबद्दल समितीने मोहीम सुरू केली आहे. मराठीला त्रिभाषा सूत्रानुसार प्राधान्य मिळालेच पाहिजे, अशी मागणी समितीची आहे. याची कार्यवाही होत नसल्याने समितीने ५ फेब्रुवारीला भार्इंदर रेल्वे स्थानक परिसरात उपोषण केले. यानंतर, प्रशासनाने नावापुरता मराठी भाषेच्या वापराला सुरुवात करून समितीच्या मागण्यांना पायदळी तुडवण्याचा प्रकार सुरू केला आहे. यावर समितीने १९ एप्रिलला मुंबई सेंट्रल येथील विभागीय कार्यालयासमोरच आंदोलनाचा इशारा दिला. या वेळी झालेल्या चर्चेत मराठीच्या कार्यवाहीला कधी सुरुवात होणार, असाही सवाल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Use of Marathi in a month in Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.