सोशल मीडियावर रंगले आभारप्रदर्शन!

By admin | Published: February 24, 2017 07:36 AM2017-02-24T07:36:45+5:302017-02-24T07:36:45+5:30

गेले काही दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचार करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी

Thanksgiving on social media! | सोशल मीडियावर रंगले आभारप्रदर्शन!

सोशल मीडियावर रंगले आभारप्रदर्शन!

Next

स्नेहा पावसकर / ठाणे
गेले काही दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून हायटेक प्रचार करणाऱ्या बहुतांशी उमेदवारांनी आता निकालानंतरही सोशल मीडियाच्याच माध्यमातून विजयी क्षणचित्रे, मतदारांचे आभार मानणाऱ्या इमेजेस, मेसेजेस झटपट पोस्ट केल्याने गुरुवार दुपारपासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपही निवडणुकीच्या निकालाने रंगून गेले होते. इतकेच नव्हे, तर हरलेल्यांपैकी काही उमेदवारांनीही आपल्याला मतदान केलेल्या मतदारांचे सोशल मीडियाद्वारे आभार मानले.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला होता. प्रचाराच्या वाढत्या रणधुमाळीबरोबरच सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या इमेजेस, मेसेजेसची संख्या वाढत होती. निकालानंतर काही तासांतच पुन्हा सोशल मीडिया विजयी उमेदवारांच्या विविध पोस्टमुळे फुललेले पाहायला मिळाले. विजयानंतर ठाण्यातील बहुतांशी उमेदवारांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांना देऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानणारे मेसेज पोस्ट केले. तर, कोणी पत्ररूपी मजकुरातून मतदारांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर ‘येणाऱ्या ५ वर्षांमध्ये प्रभागाच्या विकासाची कामे करून तुम्ही दाखवलेला विश्वास पूर्ण करेन’, अशा शब्दांत आश्वासने दिलीत. तर, अनेक इच्छुकांनी आपले दादा, मामा, ताई निवडून आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देणारे इमेजेस पोस्ट केले. कोणी विजयी झाल्यानंतरचे त्यांच्यासोबत काढलेले फोटो पोस्ट करून अभिनंदन केले होते.


दिवसभरात पोस्ट झालेले इतर मेसेजेस
निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील ५ वर्षांमध्ये अ‍ॅक्टिव्हा ते फॉर्च्युनर या भावी प्रवासासाठी, हार्दिक शुभेच्छा...

दिवसरात्र एक करून ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि ज्या मतदारराजाने मते दिली, त्यांना सूचना.
‘गाडीतून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या’,

तसेच वडापाव-८४, ढोकळा-८१
पास्ता-३१ ऊस-०९
सुकापाव-०७,
भेळ-१४

भांडण झाल्यावर माहेरी गेलेली बायको आज परत सासरी येणार, असं दिसतंय, अशा शब्दांत खिल्ली उडवली होती.

Web Title: Thanksgiving on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.