भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:24 AM2018-01-10T02:24:53+5:302018-01-10T02:25:09+5:30

शेतकरी, कामगार, नोटबंदीनंतर बेरोजगार झालेले या सर्वांची नाराजी भाजपाला भोवू नये, यासाठी हिंदुत्त्वाची चेतना जागवत अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भाजपाच्या मदतीला धावल्याची स्वयंसेवकांची भावना आहे.

The team finally ran for the help of the BJP! Uniform, what about equipment? This is the question that will be the union of unity | भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न

भाजपाच्या मदतीसाठी अखेर संघ धावला! गणवेश घातला, साधनशूचितेचे काय? संघतत्त्वे मानवणार का, हाच प्रश्न

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : शेतकरी, कामगार, नोटबंदीनंतर बेरोजगार झालेले या सर्वांची नाराजी भाजपाला भोवू नये, यासाठी हिंदुत्त्वाची चेतना जागवत अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भाजपाच्या मदतीला धावल्याची स्वयंसेवकांची भावना आहे. पण हिंदू चेतनेच्या निमित्ताने भाजपाच्या मांडवाखाली आलेल्यांनी जरी संघाची फुलपँट घातली असली; तरी साधनशूचिता, दिनचर्येत सुधारणा, चंगळवादाचा त्याग, साधी जीवनपद्धती ही तत्वे किती जणांना मानवतील, असाही तिरकस सवाल स्वयंसेवकांनी केला.
आतापासून वर्ष-दीड वर्षे स्वयंसेवकांनी पुन्हा चेतनेची हाक द्यावी आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांपर्यंत ती चेतवत न्यावी, असाही या मोहीमेचा सुप्त हेतू असल्याची चर्चा आहे. पण सत्ता मिळाल्यानंतर नवभाजपावाद्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवल्याने त्यांच्यातील आणि स्वयंसेवकांतील नाराजी दूर व्हावी, मनोमीलन व्हावे यासाठी सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न यानिमित्ताने आधी सुरू झाल्याचे मानले जाते. तसे झाले तरच भाजपाचा पुढील काळात निभाव लागेल, असा स्वच्छ इशाराच यातून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाची धोरणे चुकली असली, तरी संघ जाती किंवा दलितांविरोधात नाही, असे नि:संदिग्धपणे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रविवारी झालेल्या हिंदू चेतना संगम या उपक्रमात कल्याण-डोंबिवलीतील कार्यक्रमांमध्ये सुमारे सहा हजार स्वयंसेवकांनी संघाची फुलपँट घातली होता. त्यातील नेमके स्वयंसेवक किती आणि भाजपामधील आयत्यावेळचे स्वयंसेवक झालेले संघवादी किती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. संघाच्या मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे कान टोचण्यात आले होते. त्यामुळे संघाच्या उपक्रमांमध्ये आवर्जून उपस्थिती नोंदवत भाजपा नेत्यांनी तुमच्या विचारसरणीपासून आम्ही दूर नाही, हे दाखवून दिले.
हिंदू चेतना कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाच्या माध्यमातून वर्षभर प्रयत्न सुरु होते. त्यासाठी जनसंपर्कावर भर देण्यात आला होता. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी चार महिन्यांपासून संघ परिवाराच्या ठिकठिकाणी बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपा मंत्र्यांसह आमदारांना आवर्जून संघ मुख्यालयात कार्यशाळेसाठी जावे लागले. यंदा अन्य विषयांप्रमाणेच हिंदू चेतना संगम आपापल्या स्तरावर यशस्वी करण्यासाठी कंबर कसण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ठिकठिकाणच्या आमदारांनीही तातडीने भाजपाच्या बैठका घेतल्या. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूरसह ठाणे, मुंबई अशा सर्व ठिकाणी बैठका झाल्या. कल्याण-डोंबिवलीतील सोळा ठिकाणच्या कार्यक्रमांत स्वयंसेवकांप्रमाणेच भाजपाच्या बहुतांशी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
फुलपँटमुळे संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांची टक्केवारी वाढली असली, तरी त्यात भाजपाच्या पदाधिकाºयांमुळे फुगवटा आल्याचीही चर्चा सुरु आहे. जुने स्वयंसेवकही आले, यात शंका नसली, तरी भाजपाने मात्र संघाशी मिळतेजुळते घेतले, हे स्पष्ट झाले. आता संघशिस्तीचे पालन करण्याच्या कल्पनेने अनेकांना धडकी भरली आहे. अनेक नगरसेवकांना गणवेषात बघितल्यावर कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्याचवेळी संघाशिवाय भाजपाला तरणोपाय नाही, अशीही चर्चा सुरु होती.

‘शाखांकडे चला’ : या चेतना कार्यक्रमात पुन्हा संघ शाखांकडे चला, असा संदेश देण्यात आला. पण सध्या शाळांच्या वेळा बदललल्याने, क्लासमुळे मुलांना सायंशाखेत पाठवता येत नाही. रात्रशाखांनाही प्रतिसाद नाही. ड्युट्यांच्या वेळेतील बदलांमुळे तरूणांनाही शाखेसाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे शाखा पुनरूज्जीवित करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

भाजपा सदस्यांना संघाशी जोडणार
भाजपाने घर घर मोदी अभियान घेतले. सदस्यत्व मिळवण्यासाठी मिस्ड कॉल योजना अंमलात आणली. त्यात कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील एक लाख नवे सदस्य झाले. पण त्या साºयांना संघाशी जोडण्यात भाजपाला अद्याप यश आलेले नाही. ते करण्यासाठी भाजपाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

Web Title: The team finally ran for the help of the BJP! Uniform, what about equipment? This is the question that will be the union of unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.